CBSE XII बोर्ड परीक्षा: व्हॉट्सअॅपवर लीक झाला गणिताचा पेपर
काही लोकांनी असे सांगितले आहे की, व्हॉट्सअॅपवर CBSE १२वीचा गणिताचा पेपर लीक झाला आहे. त्यामुळे हा पेपर रद्द करावा अशी मागणी लोक करतायत.
रांची आणि धनबादच्या काही लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी (CBSE पटना क्षेत्रात येतात) असे सांगितले आहे की सोमवारी झालेला १२वीचा गणिताचा पेपर रविवारी व्हॉट्सअॅपद्वारा लीक झाला होता. हा रविवारी रात्री व्हॉट्सअॅपवर लीक झाला होता. त्यामुळे हा पेपर रद्द करावा अशी मागणी विद्यार्थी तसेच पालकांकडून होतेय.
ह्यावर CBSE च्या अधिका-यांनी सांगितले की, ह्यासंबंधी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीत केवळ २ प्रश्नच लीक झाले आहेत. जो लीक पेपर व्हॉट्सअॅपवर होता, त्यात ख-या पेपरचे केवळ २ प्रश्नच होते. त्यामुळे बोर्ड ह्या लीक म्हणून घोषित करत नाहीय.
हेदेखील पाहा – कूलपॅड नोट 3 लाइटची पहिली झलक Video
मात्र विद्यार्थी ही गोष्ट मानायला तयार नाही आहे, त्यांचे असे म्हणणे आहे की , बोर्ड जेवढे प्रश्न सांगत आहे, त्यापेक्षा जास्त प्रश्न लीक झाले आहेत.
हेदेखील पाहा – वनप्लस 2 ची किंमत झाली कमी, २००० रुपयांची झाली घट
हेदेखील वाचा – पुन्हा एकदा अपडेट झाले व्हॉट्सअॅप, मिळणार हे नवीन फीचर
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile