Google Chrome मध्ये संपूर्ण प्रायव्हसी मिळेल, वैयक्तिक टॅब तुमच्या फिंगरप्रिंटने उघडेल

Google Chrome मध्ये संपूर्ण प्रायव्हसी मिळेल, वैयक्तिक टॅब तुमच्या फिंगरप्रिंटने उघडेल
HIGHLIGHTS

Google Chrome वर आता तुम्ही अधिक सुरक्षित होणार

तुमच्या प्रायव्हसीसाठी नवीन फिचर उपलब्ध

यूजर्सना वैयक्तिक इन्कॉग्निटो टॅब लॉक करण्याचा पर्याय मिळेल

सर्च इंजिन कंपनी गुगलचे इंटरनेट ब्राउझर क्रोम हे सर्वात लोकप्रिय ब्राउझरपैकी एक आहे, यात शंका नाही. कंपनी त्यात नवनवीन फीचर्स देत असते आणि आता यूजर्सना इन्कॉग्निटो टॅब लॉक करण्याचा पर्याय मिळत आहे. अधिक चांगली प्रायव्हसी देऊन, वापरकर्त्यांना आता त्यांच्या ब्राउझरमध्ये गुप्त टॅब लॉक करण्याची संधी मिळत आहे. नवीन सेटिंग्जसह, वापरकर्ते ब्राउझरमधून बाहेर पडताच वैयक्तिक टॅब लॉक केले जाईल आणि फक्त त्यांच्या फिंगरप्रिंटने ते अनलॉक होईल.

हे सुद्धा वाचा : Flipkart Big Billion Day सेलमध्ये 'या' स्मार्टफोन्सवर मिळेल प्रचंड सवलत, जाणून घ्या किमंत

गुगल क्रोम ब्राउझरला मिळालेल्या नवीन अपडेटनंतर तुम्ही तुमचा फोन कुणालाही दिला तरी तो गुप्त टॅब उघडू शकणार नाही, असे नवीन रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. 2020 पासून वापरकर्त्यांना Google Chrome मध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरणाचा पर्याय मिळत आहे, जेव्हा कंपनीने iOS ऍपमध्ये incognito मोडमध्ये प्रायव्हसी स्क्रीन फिचर समाविष्ट केले होते. आयफोनवरील क्रोम वापरकर्त्यांना टच आयडी किंवा फेस आयडीच्या मदतीने टॅब अनलॉक करण्याचा पर्याय आधीच मिळतो. आता असेच फीचर अँड्रॉईड उपकरणांमध्येही दिले जात आहे.

नवीन गुगल क्रोम फीचर 'अशा' प्रकारे काम करेल

Android प्लॅटफॉर्मवर Google Chrome वापरकर्त्यांना एक ग्रे स्क्रीन दर्शविली जाईल, ज्याच्या मध्यभागी टॅप करून ते त्याच्याशी संबंधित सेटिंग्ज बदलण्यास सक्षम असतील. येथे त्यांना 'अनलॉक इनकॉग्निटो' मोडचा पर्याय देखील मिळेल आणि ते ऑथेंटिकेशन फिचर निवडण्यास सक्षम असतील. यानंतर, फिंगरप्रिंट स्कॅन केल्यानंतर, टॅब उघडेल आणि कंटेंट ऍक्सेस केला जाईल. 

 फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन 

नवीन Google Chrome फिचर पर्यायी आहे, म्हणजे अपडेट प्राप्त झाल्यानंतर ते आपोआप अनेबल होणार नाही. क्रोम अपडेट केल्यानंतर, वापरकर्त्यांना सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि 'Lock incognito tabs when you leave chrome' वर टॅप करावे लागेल आणि ते आवश्यक बदल करू शकतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo