Whatsapp हे जगभरात वापरले जाणारे लोकप्रिय मेसेजिंग ऍप आहे. तुम्हीही इन्स्टंट मेसेजिंग ऍपच्या ग्रुप फीचरला कंटाळले असाल आणि ग्रुप सोडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आत्तापर्यंत यूजर्सना एक समस्या भेडसावत होती, ती म्हणजे ग्रुप सोडल्यावर इतर सदस्यांना त्याची माहिती मिळत असे. पण एका खास युक्तीद्वारे तुम्ही ग्रुप सोडल्याचे इतरांना कळणारही नाही.
हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Xiaomi चा 32 इंच स्मार्ट TV वर मिळतेय भारी सूट, 'येथे' मिळतेय आकर्षक ऑफर
– जे iPhone वापरतात किंवा त्यांच्या ऍपल डिव्हाईसवर व्हॉट्सऍप इन्स्टॉल केले आहे, त्यांना ग्रुपवर डावीकडे स्वाइप करावे लागेल.
– MORE वर टॅप करा.
– त्यानंतर Exit वर क्लिक करा.
– यूजर्सना स्क्रीनवर एक मेसेज दिसेल, 'फक्त ग्रुप Admin ला कळवले जाईल की तुम्ही ग्रुप सोडला आहे.'
– तुम्ही ग्रुप सोडू इच्छित असलेल्या ग्रुपवर टॅप करून होल्ड करा.
– नंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन-डॉट्स चिन्हावर टॅप करा.
– Exit निवडा.
– यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर एक संदेश दिसेल, 'फक्त ग्रुप Admin ला सूचित केले जाईल की तुम्ही ग्रुप सोडला आहे.'
जगातील सर्वात मोठ्या इन्स्टंट मेसेजिंग सेवेपैकी एक असलेल्या Whatsappने एक फिचर जारी केले आहे, जे वापरकर्त्यांना कोणालाही न कळवता गट सोडण्याची परवानगी देते. याच्या मदतीने युजर्स निरुपयोगी मॅसेज आणि नोटिफिकेशन्सच्या त्रासापासून मुक्त होतात.