देशी ट्विटर Koo App होणार बंद! कंपनीच्या संस्थापकाने दिली माहिती, जाणून घ्या काय आहे कारण? 

देशी ट्विटर Koo App होणार बंद! कंपनीच्या संस्थापकाने दिली माहिती, जाणून घ्या काय आहे कारण? 
HIGHLIGHTS

देशी ट्विटर म्हणजेच Koo App बंद करण्याचा निर्णय

देशी ट्विटर म्हणजेच Koo App युजर्ससाठी चार वर्षांपूर्वी सादर करण्यात आले होते.

Koo कंपनीचे सह-संस्थापक मयंक बिदावतका LinkedIn वर पोस्ट शेअर करत दिली माहिती

Koo App Shut Down: प्रसिद्ध आणि लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X म्हणजेच (Twitter) शी स्पर्धा करण्यासाठी, देशी ट्विटर म्हणजेच Koo App युजर्ससाठी सादर करण्यात आले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, चार वर्षांपूर्वी आलेले Koo App वापरकर्त्यांच्या फारसे पसंतीस आले नाही. अशा परिस्थितीत गेल्या चार वर्षांपासून कंपनी बाजारात टिकून राहण्यासाठी धडपडत करत होती. मात्र, अखेर आपली धडपड संपुष्टात आणत कंपनीने Koo App बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Also Read: लक्ष द्या! आजपासून केवळ ‘या’ Jio प्लॅनसह मिळेल अमर्यादित 5G डेटाचा लाभ, बघा संपूर्ण यादी

Koo App बंद करण्याचा निर्णय

मागील काही दिवसांपासून Koo ॲपच्या अधिग्रहणाची चर्चा सुरु होती, पण हे प्रकरण प्रत्यक्षात आले नाही. त्यानंतर Koo कंपनीचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी अलीकडेच LinkedIn प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये माहिती दिली की, “आम्ही अनेक मोठ्या इंटरनेट कंपन्या, समूह आणि मीडिया हाऊसशी चर्चा केली, परंतु आम्हाला हवे तसे परिणाम मिळाले नाहीत.”

देशी ट्विटर म्हणजेच Koo App बंद करण्याचा निर्णय

Koo ॲप बंद होण्यापूर्वी कंपनीच्या सह-संस्थापकांनी ॲपबद्दल काही महत्त्वाची माहिती देखील शेअर केली आहे. उदाहरणार्थ, Koo ॲपवर दर महिन्याला 10 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. त्याबरोबरच, 2.1 दशलक्ष दैनिक सक्रिय वापरकर्ते, दरमहा 10 दशलक्ष पोस्ट आणि 9 हजारांहून अधिक VIP खाती होती.

Koo App बद्दल थोडक्यात माहिती

गेल्या 2020 मध्ये लाँच केलेले Koo ॲप ही पहिली भारतीय मायक्रोब्लॉगिंग साइट होती, जी वापरकर्त्यांसाठी 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध होती. आत्तापर्यंत हे ॲप 60 दशलक्ष म्हणजेच 6 कोटींहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. भारतात लाँच झाल्यानंतर Koo ने नायजेरिया आणि ब्राझील या देशांमध्ये देखील सेवांचा विस्तार केला.

याव्यतिरिक्त, पुढे आलेल्या रिपोर्ट्सनुसार Koo ॲपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून टाळेबंदीची प्रक्रिया सुरू होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, एप्रिल 2023 मध्ये कंपनीने आपल्या सुमारे एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, Koo ने Accel आणि Tiger Global सारख्या गुंतवणूकदारांकडून $60 दशलक्ष पेक्षा जास्त निधी उभारला होता. परंतु असे असूनही कंपनीला लोकांच्या मनात स्थान मिळवण्यात यश आले नाही. एवढेच नाही तर, एक काळ असाही होता की, स्टार्टअपमधील अडचणीमुळे संस्थापकांना कर्मचाऱ्यांचे पगार स्वतःच्या खिशातून द्यावे लागले.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo