JioFinance App: नवे ऍप लाँच! मिळणार UPI पेमेंट, मोबाइल रिचार्जसारख्या सुविधा, जाणून घ्या फीचर्स 

JioFinance App: नवे ऍप लाँच! मिळणार UPI पेमेंट, मोबाइल रिचार्जसारख्या सुविधा, जाणून घ्या फीचर्स 
HIGHLIGHTS

Jio Financial Services ने आपले अपडेटेड JioFinance ॲप लाँच केले आहे.

सुमारे 15 लाख ग्राहकांनी त्यांच्या Jio Payments Bank Limited (JPBL) मध्ये बचत खाती उघडली आहेत.

हे अकाउंट केवळ 5 मिनिटांत डिजिटल पद्धतीने उघडता येते.

JioFinance App: सुधारणा करण्यासाठी अभिप्राय मिळाल्यानंतर, रिलायन्सच्या वित्तीय सेवा शाखेने शुक्रवारी नवीन JioFinance ॲप लाँच झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. नवे ऍप वापरकर्त्यांसाठी Google Play Store, Apple App Store आणि MyJio वर उपलब्ध असेल. JioFinance ॲपचे बीटा वर्जन 30 मे 2024 रोजी लाँच करण्यात आले.

JioFinance ॲप Paytm, phonepe, Google Pay सारख्या ॲप्सशी जबरदस्त स्पर्धा करेल. ग्राहकांच्या अभिप्रायावर अवलंबून, बीटा लाँच झाल्यापासून आर्थिक उत्पादने आणि सेवांची श्रेणी जोडली गेली आहे, ज्यात म्युच्युअल फंड्सवरील कर्ज, गृह कर्ज (बॅलेन्स ट्रान्सफर) इ. चा समावेश आहे, असे कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगद्वारे सांगितले.

Also Read: Realme 11 5G स्मार्टफोन भारी Discount सह Flipkart वर उपलब्ध, फोटोग्राफीचा मिळेल अप्रतिम अनुभव

JioFinance ऍप

JioFinance ऍपमध्ये अनेक सर्व्हिसेस जोडण्यात आले आहेत. ज्यामुळे ते इतर ॲप्सपेक्षा वेगळे बनते. JioFinance ऍपद्वारे म्युच्युअल फंड्सवर कर्ज घेता येईल. तसेच, मालमत्तेवर कर्ज घेता येईल. हे ॲप होम लोन आणि होम लोन बॅलन्स ट्रान्सफरचा ऑप्शन देखील देते. आर्थिक बाजारपेठेत आपला पाय रोवण्यासाठी कंपनी स्पर्धात्मक दराने कर्ज उपलब्ध करून देईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

JioFinance App
JioFinance App

Jio ने सांगितले की

सुमारे 15 लाख ग्राहकांनी त्यांच्या Jio Payments Bank Limited (JPBL) मध्ये बचत खाती उघडली आहेत, असे Jio ने सांगितले आहे. हे अकाउंट केवळ 5 मिनिटांत डिजिटल पद्धतीने उघडता येते. कंपनी अकाउंटसोबत डेबिट कार्ड देखील देत ​​आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरणामुळे जेपीबीएलचे बचत खाते अधिक सुरक्षित होईल, असे देखील कंपनीने सांगितले आहे.

एवढेच नाही तर, JioFinance ॲपच्या मदतीने वापरकर्ते UPI पेमेंट, मोबाईल रिचार्ज आणि क्रेडिट कार्ड बिल पेमेंट देखील करू शकतील. याव्यतिरिक्त, ग्राहकांची सर्व बँक खाती आणि त्यांचे म्युच्युअल फंड होल्डिंग देखील JioFinance ॲपमध्ये लिंक केले जाऊ शकतात. हे ॲप आयुर्विमा, टू व्हीलर आणि मोटार विमा क्षेत्रातही अनेक सेवा पुरवते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo