तुम्हीही भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही WhatsAppच्या मदतीने ट्रेनमध्ये ऑनलाइन जेवण ऑर्डर करू शकता. वास्तविक, IRCTC या भारतीय रेल्वेच्या शाखेने ऑनलाइन फूड ऑर्डर सुविधा सुरू केली आहे, ज्यामध्ये प्रवासी PNR नंबर वापरून WhatsAppवरूनच ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करू शकतील. या चॅटबॉट सेवेसाठी IRCTC ची फूड डिलिव्हरी सर्व्हिस Zoop ने Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे.
हे सुद्धा वाचा : Oppo घेऊन येतोय बजेट सेगमेंटचा आणखी एक दमदार फोन, मिळेल आकर्षक डिझाइन
IRCTC च्या या ऑनलाइन फूड सुविधेसाठी प्रवाशांना फक्त त्यांचा PNR नंबर वापरावा लागेल, त्यानंतर थोड्याच वेळात सीटवर गरम जेवण उपलब्ध होईल. ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यासाठी प्रवाशांना कोणतेही ऍप डाउनलोड करण्याची गरज नाही. झूपच्या मदतीने प्रवासी व्हॉट्सऍप चॅटवर सोयीनुसार कोणत्याही स्टेशनवरून खाद्यपदार्थ मागवू शकतात. यासोबतच प्रवाशांना व्हॉट्सऍप चॅटद्वारे रिअल-टाइम फूड ट्रॅकिंग, फीडबॅक आणि हेल्पलाइनचाही सपोर्ट मिळेल. 100 हून अधिक रेल्वे स्टेशनसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पदार्थ ऑर्डर करण्याची सुविधा मिळेल.
ट्रेनमध्ये तुमच्या सीटवर जेवण ऑर्डर करण्यासाठी, तुम्हाला +917042062070 या नंबरवर Zoop मेसेज करावा लागेल. यानंतर तुम्हाला दहा अंकी PNR नंबर टाइप करावा लागेल. यानंतर, तुम्हाला रेस्टॉरंट निवडावे लागेल आणि तुम्हाला ऑर्डर करायच्या असलेल्या खाद्यपदार्थाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही पेमेंट करून ऑर्डर कन्फर्म करू शकता. यानंतर, तुम्ही व्हॉट्सऍप चॅटमधूनच रिअल-टाइम फूड ट्रॅकिंग आणि फीडबॅक फीचर देखील वापरू शकता.