2010 मध्ये इंस्टाग्राम लाँच करण्यात आले, तेव्हापासून तुम्हाला येथे प्रत्येक परिस्थितीत नवनवीन फीचर्सची सुविधा मिळत आहे. हे फोटो शेअरिंग ऍप म्हणून आले आणि आता ते शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग म्हणूनही वापरले जात आहे. वापरकर्त्यांना येथे व्हिडिओ, रील, IGTV आणि स्टोरीज सारखी फीचर्स मिळतात. कंपनी वापरकर्त्यांना डायरेक्ट मॅसेज पाठवण्याची सुविधा देखील देते.
हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy S23 सिरीजची प्री-बुकिंग सुरू, ग्राहकांना मिळणार 5,000 रुपयांचे फायदे
यासाठी इंस्टाग्रामचे डायरेक्ट मेसेज फीचर देण्यात आले आहे. जेथे युजर्स प्रायव्हेट चॅट करू शकतात. तुम्ही Instagram वर डायरेक्ट मॅसेजसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन चॅट फिचर सक्रिय करू शकता. मेटा WhatsApp आणि मेसेंजरसाठी समान सिक्योरिटी फिचर वापरते. या सिक्योरिटीसह, कोणीही वापरकर्त्याचे मॅसेज वाचू शकत नाही. कंपनी देखील हे मॅसेज वाचू शकत नाही आणि तुमचे कॉल आणि मॅसेज सुरक्षित राहतात.
Instagram मध्ये एंड-टू-एंड एनक्रिप्शन फिचर सक्रिय करणे खूप सोपे आहे. यानंतर, वरच्या उजव्या कोरण्यात कंपोज बटणवर क्लिक करा आणि नंतर लॉक आयकॉनवर क्लिक करा.
आता येथे तुम्ही ते अकाउंट निवडा ज्यासह तुम्हाला एंड-टू-एंड एनक्रिप्टेड चॅट सुरू करायचे आहे. आता तुम्ही चॅट बटणवर क्लिक करून चॅट सुरू करू शकता.