आता इन्स्टाग्रामवर १ मिनिटांचा व्हिडियो अपलोड करता येणार

Updated on 01-Apr-2016
HIGHLIGHTS

कंपनीचे असे म्हणणे आहे की, अनेक यूजर्स असे आहेत, ज्यांना मोठे व्हिडियोज लोकांशी शेअर करायचे असतात, त्यासाठी हे फीचर आणण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे.

अलीकडे इन्स्टाग्राम हा खूपच लोकप्रिय अॅप बनला आहे. मात्र ह्या अॅपवर आतापर्यंत केवळ छोटे व्हिडियो अपलोड केले जाऊ शकत होते आणि ह्या व्हिडियोची वेळमर्यादा केवळ १५ सेकंदच होती. मात्र आता इन्स्टाग्रामने ही वेळमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता इन्स्टाग्रामने आपल्या यूजर्सची गरज लक्षात घेऊन, व्हिडियोची वेळमर्यादा वाढवून १५ सेकंदापासून ६० सेकंद केली आहे. त्यामुळे आता यूजर्स इन्स्टाग्रामवर पुर्ण १ मिनिटांचा व्हिडियो अपलोड करु शकणार. ह्या फीचरचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपले इन्स्टाग्राम अपडेट करावे लागेल, ज्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. नोटिफिकेशन प्राप्त न झाल्यास आपण गुगल प्ले स्टोरवर जाऊनसुद्धा हा अपडेट करु शकतात. इन्स्टाग्रामने ही माहिती आपल्या ऑफिशियल ब्लॉगवर दिली आहे.
 

ह्या ब्लॉगमध्ये असेही सांगितले आहे की, मागील ६ महिन्यांत इन्स्टाग्रामवर व्हिडियो बघणा-यांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, बरेच असे यूजर्स आहेत, जे थोडे मोठी व्हिडियो लोकांशी शेअर करु इच्छितात. त्यामुळे कंपनीने हा फीचर आणण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ह्यात ६० सेकंदाचा व्हिडियो देण्याची सुविधा iOS आणि अॅनड्रॉइड वर आता सुरु केली आहे. iOS वर ह्या अपडेटमध्ये अनेक उपयोगी टूल्ससुद्धा उपलब्ध होतील. ज्यात कॅमेरा रोलद्वारा मल्टिपल क्लिपचा उपयोग करुन व्हिडियो बनविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

 

हेदेखील वाचा – अखेर भारतात लाँच झाला शाओमी Mi 5 स्मार्टफोन, किंमत २४,९९९ रुपये

हेदेखील वाचा – एसर क्रोमबुक 14 लॅपटॉप: १४ तासांपर्यंत देणार बॅटरी लाइफ

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :