Instagram वर आता ‘ही’ महत्त्वाची सुविधा मिळणार नाही, जाणून घ्या आगामी नवीन फीचर्स

Instagram वर आता ‘ही’ महत्त्वाची सुविधा मिळणार नाही, जाणून घ्या आगामी नवीन फीचर्स
HIGHLIGHTS

Instagram होम फीडमध्ये मोठे बदल करणार

शॉपिंग टॅब हटवण्यात येणार आहे.

आगामी फीचर्स पुढील महिन्यापासून रिलीज होतील.

मेटाच्या मालकीचे फोटो-व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म Instagram होम फीडमध्ये मोठा बदल करणार आहे. अहवालानुसार, कंपनी आपल्या होम फीडमधून शॉपिंग टॅब काढून टाकणार आहे. तर, त्याच्या जागी 'क्रिएट न्यू पोस्ट' टॅब जोडला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडेच प्लॅटफॉर्मवर Instagram Notes, Candid Stories, Group Profile सारखे अनेक फीचर्स रिलीज करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा : Paytm अकाउंट डिलीट करायचे आहे ? येथे जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

इन्स्टाग्रामचा नवा बदल पुढील महिन्यापासून रिलीज होऊ शकतो. मात्र, वापरकर्ते प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतील. कंपनीने सांगितले की, वापरकर्ते होम शॉपिंग टॅबऐवजी प्लॅटफॉर्मवरून म्हणजे शॉर्टकटशिवाय खरेदी करू शकतील. Instagram त्याच्या वापरकर्त्यांना शॉपिंग टॅबद्वारे स्मार्टफोनपासून स्मार्टफोन ऍक्सेसरीजपर्यंत आणि शूजपासून कपड्यांपर्यंत सर्व काही खरेदी करण्याची परवानगी देतो.

आगामी फीचर्स

 या बदलासोबतच प्लॅटफॉर्मवर 'क्रिएट न्यू पोस्ट' टॅबसह आणखी बरेच बदल केले जात आहेत. म्हणजेच, प्लॅटफॉर्मवरील होम फीडमध्ये टॅबची संख्या बदलली जात नाही. आता Instagram वर शॉपिंग टॅबऐवजी नवीन Create New Post टॅब दिसेल. प्लॅटफॉर्मने अलीकडेच इंस्टाग्राम नोट्स, कॅन्डिड स्टोरीज, ग्रुप प्रोफाइल्स, कोलाबोरेशन कलेक्शन इ. फीचर्स सादर केले आहेत.

कँडिड स्टोरीज 

इंस्टाग्रामचे हे फीचर BeReal ऍप्लिकेशनद्वारे प्रेरित आहे. फिचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे. कँडिड स्टोरीजमध्ये युजर्सला नोटिफिकेशनवर क्लिक करून त्यांचा फोटो अपलोड करावा लागेल. हा फोटो फक्त त्या लोकांनाच दिसेल जे स्वतः कँडिड स्टोरीज शेअर करतात. 

इंस्टाग्राम नोट्स फीचर्स

इंस्टाग्रामने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे नवीन फीचर्स वापरकर्त्यांना त्यांचे मित्र आणि कुटुंबाशी कनेक्ट करण्यात मदत करतील. इंस्टाग्राम नोट्स फिचर वापरकर्त्यांना त्यांच्या मित्रांना मजकूर आणि इमोजी वापरून अपडेट करण्यास अनुमती देतो. म्हणजेच, या फीचरला स्टेटसचे छोटे स्वरूप म्हटले जाऊ शकते, ज्यामध्ये वापरकर्ते इमोजी आणि मजकूरात 60 कॅरेक्टरपर्यंत एक छोटी स्टोरी पोस्ट करू शकतात. वापरकर्ते त्यांच्या नोट्स मर्यादित देखील करू शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo