इंस्टाग्राम युजर्सची मज्जाच मजा ! कंटेंट शेड्युलिंग टूल जारी, जाणून घ्या आणखी काय आहे खास…

इंस्टाग्राम युजर्सची मज्जाच मजा ! कंटेंट शेड्युलिंग टूल जारी, जाणून घ्या आणखी काय आहे खास…
HIGHLIGHTS

इंस्टाग्राम युजर्ससाठी नवनवीन फिचर जारी करत आहे.

सध्या बिजनेस अकाउंटसाठी कंटेंट शेड्यूलिंग टूल जारी करण्यात आले आहे.

निर्माते त्यांच्या रीलवर आगामी अचिव्हमेंट्सवर देखील लक्ष ठेवू शकतात.

मेटा-मालकीच्या फोटो-व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म Instagram ने वापरकर्त्यांसाठी आणखी एक बेस्ट फिचर जारी केले आहे, ते म्हणजे 'कंटेंट शेड्यूलिंग टूल' होय. या फीचरद्वारे, वापरकर्ते त्यांचा कंटेंट पोस्ट करण्यासाठी शेड्यूल करण्यास सक्षम असतील. होय, आता वापरकर्त्यांना ऍडव्हान्स सेटिंग्ज पर्याय मिळतील, ज्याच्या मदतीने पोस्ट शेड्यूल करता येईल. दरम्यान, अलीकडेच प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल फोटोवर गाणे टाकण्याच्या फीचरची माहिती समोर आली आहे. 

हे सुद्धा वाचा : तब्बल 10-दिवसांची बॅटरी लाइफ आणि 100 स्पोर्ट्स मोडसह boAt चे नवीन स्मार्टवॉच लाँच

 अशाप्रकारे काम करेल नवीन फिचर

ताज्या अहवालांनुसार, इंस्टाग्रामवरील बिजनेस अकाउंटसाठी कंटेंट शेड्यूलिंग टूल जारी करण्यात आले आहे. शेड्युलिंग टूल वापरून रील, फोटो-व्हिडिओ आणि कॅरोसेल पोस्ट 75 दिवसांपर्यंत शेड्यूल केल्या जाऊ शकतात. वापरकर्त्यांना ऍडव्हान्स सेटिंग्जमध्ये शेड्यूलिंग टूलचा पर्याय मिळेल.

कंटेंट शेड्यूलिंग टूलसह, रील निर्मात्यांना बक्षीस देण्यासाठी उपलब्ध फिचरबद्दल माहिती देखील समोर आली आहे. मात्र, सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. या फीचरद्वारे, निर्मात्यांना असे यश मिळणे अपेक्षित आहे, जे त्यांना रील तयार करताना खूप मदत करेल. त्याबरोबरच या फिचरद्वारे, वापरकर्ते इतर रील निर्मात्यांसह देखील सहयोग करू शकतात. त्याच वेळी, कम्युनिटीसह ट्रेंड फॉलो देखील करू शकता. तसेच, निर्माते त्यांच्या रीलवर आगामी अचिव्हमेंट्सवर देखील लक्ष ठेवू शकतात. सध्या छोट्या ग्रुपसह त्याची चाचणी सुरू आहे. कंपनी हे  लवकरच हे फीचर रिलीज करू शकते, अशी अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo