मेटाच्या मालकीची कंपनी Instagramने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक मोठे अपडेट जारी केले आहे. नवीन अपडेटनंतर तुम्हाला आता तुमच्या प्रोफाइलमध्ये तीन पोस्ट किंवा कोणत्याही तीन रील पिन करता येतील. तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमच्या सर्वोत्तम तीन पोस्ट किंवा रील पिन करू शकता, म्हणजे ते प्रोफाइलमध्ये शीर्षस्थानी दिसतील. हे फीचर फेसबुक पेजच्या पिन टू टॉप सारखे आहे. हे फीचर ट्विटर आणि टिकटॉकमध्ये आधीपासूनच आहे. चला तर जाणून घेऊयात या फिचरबद्दल सविस्तर माहिती…
हे सुद्धा वाचा : 8GB रॅम, फास्ट चार्जिंग असलेला Oppo स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
जर तुम्हाला तुमची कोणतीही पोस्ट किंवा रील पिन करायची असेल, तर सर्वप्रथम त्या रीलवर जा आणि बाजूला दिसणार्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा. त्यानंतर 'Pin to your profile' या पर्यायावर क्लिक करा. यानंतर, ती पोस्ट किंवा रील तुमच्या प्रोफाइलच्या डाव्या कोपर्यात ग्रिडमध्ये दिसेल.
तुम्हाला दुसरी पोस्ट देखील पिन करायची असल्यास तुम्ही तीच प्रक्रिया पुन्हा करू शकता. हे फिचर पहिल्यांदा या वर्षी जानेवारीमध्ये ट्रायल दरम्यान दिसले होते. त्यानंतर आता कंपनीने ते सर्वांसाठी जारी केले आहे.
गेल्या आठवड्यातच इंस्टाग्रामने सांगितले होते की, ते रील्सची वेळ 60 सेकंदांवरून 90 सेकंदांपर्यंत वाढवणार आहेत. या नवीन अपडेटसह, वापरकर्ते 90 सेकंदांचे रील रेकॉर्ड करण्यास सक्षम असतील. नवीन अपडेटनंतर, तुम्ही आता रील्समध्येच व्हिडिओ शेअर करू शकता, म्हणजेच इंस्टाग्रामच्या कॅमेऱ्याऐवजी तुम्हाला फोनच्या कॅमेऱ्यातून रेकॉर्ड केलेला व्हिडिओ क्लिपमध्ये ऍड करता येईल. त्याबरोबरच, तुम्हाला आता तुमचा स्वतःचा ऑडिओ देखील इंस्टाग्रामवर ऍड करता येईल.