इन्स्टाग्राम ने आणला नवीन विडियो चॅट फीचर

Updated on 28-Jun-2018
HIGHLIGHTS

इन्स्टाग्राम ने विडियो चॅट फीचर सोबतच नवीन कॅमेरा फिल्टर्स आणि अपडेटेड एक्स्प्लोर पेज पण देण्यात आला आहे.

Instagram introduces new Video Chat feature: जर तुम्ही इन्स्टाग्राम वर जास्त वेळ घालवण्यासाठी एक नवीन कारण शोधत असाल तर तुमच्या साठी कंपनी ने नवीन फीचर्स आणले आहेत. इन्स्टाग्राम ने नवीन फीचर्स ची घोषणा केली आहे ज्यात विडियो चॅट, एक्स्प्लोर पेज वर टॉपिक चॅनल्स आणि नवीन कॅमेरा इफेक्ट्स यांचा समावेश आहे. कंपनी ने मागच्या महिन्यात फेसबुक F8 कांफ्रेंस मध्ये हा नवीन विडियो चॅट फीचर टीज केला होता आणि कंपनी ने हा इन्स्टागर्म डायरेक्ट अंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

या नवीन फीचर मुळे तुम्ही त्या प्रत्येक यूजर सोबत चॅट करू शकता ज्याने डायरेक्ट मेसेज एक्टिव केला असेल आणि या फीचर ची खास बाब ही आहे की तुम्ही एकवेळी चार यूजर्सना अॅड करू शकता. कॉल सुरू करण्यासाठी तुम्हाला इनबॉक्स मध्ये जावे लागेल, कॅमेरा आइकॉन वर टॅप करावे लागेल आणि त्यानंतर तुमच्या मित्राला फोन वर कॉल चा अलर्ट मिळेल. 

या नवीन फीचर ची एक खास बाब ही आहे की हा तुम्हाला मल्टीटास्क करू देतो. त्यामुळे तुम्ही विडियो चॅट वर असूनही चॅट मिनीमाइज करून पेज ब्राउज करू शकता, किंवा एखादी स्टोरी पोस्ट करू शकता. 

विडियो चॅटिंग सोबत इन्स्टाग्राम ने अपडेटेड एक्स्प्लोर पेज पण सादर केला आहे. या नवीन अपडेट मध्ये फोटो आणि विडियो एका टॉपिक चॅनल मध्ये अॅड होतील जिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना बघू शकाल. इन्स्टाग्राम नुसार हा नवीन फीचर यूजर्सना सहज पेज नेविगेट करण्यास मदत करेल कारण आता ते चॅनल्स दिसतील जे त्यांना जास्त आवडतात. नवीन चॅनल्स मध्ये हॅशटॅग्स ची लिस्ट पण असेल, जी कंपनी ला वाटते की यूजर्सना आपल्या आवडीनुसार एक्स्प्लोर करण्यास चांगला पर्याय देईल. 

याव्यतिरिक्त यूजर्सना नवीन कॅमेरा इफेक्ट्स पण मिळत आहेत ज्यांना Ariana Grande, Baby Ariel, Buzzfeed, Liza Koshy आणि NBA ने डिजाइन केले आहे. इन्स्टाग्राम ने काही दिवसांपूर्वी IGTV अॅप पण लॉन्च केला आहे ज्या मध्ये यूजर्स एक तासांपर्यंत चे मोठे विडियो बघू आणि पोस्ट करू शकतात. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :