पुन्हा एकदा मोठी कारवाई करत भारत सरकारने अनेक ऍप्सवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. ताज्या अहवालात असे कळले आहे की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) 138 बेटिंग ऍप्स आणि 94 लोन लेंडिंग ऍप्सवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. हे ऍप्स युजर्सचा डेटा चोरून चीनसोबत शेअर करत होते, अशी माहिती पुढे आली आहे.
हे सुद्धा वाचा : Airtel च्या 'या' स्वस्त रिचार्ज प्लॅन्समुळे ग्राहक खुश, मिळेल मोफत OTT सब्स्क्रिप्शन
ताज्या अहवालात, सूत्रांनी माहिती दिली आहे की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने MeitY 138 बेटिंग ऍप्स आणि 94 कर्ज देणाऱ्या ऍप्सवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच MeitY ला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून हे ऍप्स ब्लॉक करण्याचा आदेश प्राप्त झाला. त्यामुळे MeitY ने हे ऍप्स ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे.
सरकारने या ऍप्सवर आयटी कायद्याचे कलम 69 लागू केले आहे. या ऍप्समध्ये भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला हानी पोहोचवणाऱ्या अशा सामग्रीचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, जवळपास सर्व बंदी घातलेले ऍप्स चिनी नागरिकांनी बनवले आहेत. भारतीय वापरकर्त्यांचा महत्त्वाचा डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचत होता.
6 महिन्यांपूर्वी सरकारने अशा 28 ऍप्सची चौकशी सुरू केली होती, जे लोकांना कर्ज देऊन दुप्पट रक्कम वसूल करत होते. कर्ज घेतलेल्या व्यक्तीला दुप्पट रक्कम परत करता येत नाही, तेव्हा त्यांना वेगवेगळ्या मार्गाने त्रास द्यायचे. जेव्हा या ऍप्सची चौकशी सुरू झाली तेव्हा या ऍप्सचे तार चीनशी जोडलेली आहे, असे आढळून आले.