आता WhatsApp वरच तयार करा इच्छित AI इमेजेस, ‘हे’ फिचर करणार थर्ड पार्टी Appsची सुट्टी? Tech News

Updated on 24-Apr-2024
HIGHLIGHTS

जगप्रसिद्ध Meta AI ला WhatsApp वर टेस्ट करत आहे.

मेटा AI आयकॉन भारतात WhatsApp मधील मुख्य चॅट लिस्टमध्ये उपलब्ध आहे.

WhatsApp वर AI इमेज कशी निर्माण करायची? जाणून घ्या.

मेटा आपल्या AI चॅटबॉटची टेस्टिंग करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Meta AI ला WhatsApp वर टेस्ट करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा चॅटबॉट फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या देशातील इतर मेटा प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. मेटा AI आयकॉन भारतात WhatsApp मधील मुख्य चॅट लिस्टमध्ये उपलब्ध आहे. हा जनरेटिव्ह AI-आधारित चॅटबॉट ‘लार्ज लँग्वेज मॉडेल मेटा एआय (LIama)’ वर चालतो. यासह WhatsApp वापरकर्ते क्रिएटिव्ह पद्धतीने कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू शकतात.

हा चॅटबॉट जनरेटिव्ह AI टूल असल्याने, वापरकर्त्यांना काही सेकंदात इमेजेस तयार करता येतील. जर तुम्हाला हे फिचर मनोरंजक वाटत असेल आणि तुम्हाला WhatsApp मध्ये Meta AI मध्ये ऍक्सेस कसा करायचा आणि ते वापरून AI इमेज कशी निर्माण करायची? हे जाणून घ्यायचे असल्यास या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया सांगणार आहोत.

how to use Meta AI chatbot on WhatsApp to generate AI images

WhatsApp वर Meta AI कसे ऍक्सेस कराल?

  • सर्वप्रथम, तुमच्या Android किंवा iOS स्मार्टफोनवर WhatsApp ओपन करा.
  • तुम्हाला ॲपच्या होम स्क्रीनवर सर्क्युलर रिंग दिसत आहे का ते बघा. तुम्ही iOS वापरत असल्यास, तुम्हाला ही रिंग टॉपवर असलेल्या निळ्या ‘+’ बटणापूर्वी दिसेल. तर, Android वर ती हिरव्या ‘+’ बटणाच्या वर ठेवली जाईल.
  • तुम्हाला ही रिंग दिसल्यास, तुम्हाला या फिचरचा आधीच ऍक्सेस मिळाला आहे. जर तुम्हाला ही रिंग दिसत नसेल तर तुम्ही तुमचे WhatsApp अपडेट करून घ्या.
  • आता तुम्हाला मेटा AI बटण त्याच ठिकाणी दिसेल जिथे सर्क्युलर रिंग असायला हवी होती. फिचर वापरण्यासाठी या बटणवर टॅप करा आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते विचारा. यासह तुम्हाला इमेजेस देखील तयार करता येतील.
How to use WhatsApp-Meta-AI

AI इमेजेस कसे तयार कराल?

  • WhatsApp वर Meta AI ChatOut उघडा.
  • आता, “/imagine” कमांड वापरून जनरेटिव्ह मोड ऍक्टिव्ह करा.
  • तुम्हाला तयार करायची असलेली इमेज स्पष्ट करण्यासाठी प्रॉम्प्ट एंटर करा.
  • यानंतर AI इमेज जनरेट करण्यासाठी सेंड बटणवर टॅप करा.
  • तुमची इमेज अवघ्या काही सेकंदात तयार होईल.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :