WhatsaApp : आता स्टेटसमध्ये पब्लिश होणार व्हॉइस नोट, ‘अशा’प्रकारे शेअर करा Voice Status

WhatsaApp : आता स्टेटसमध्ये पब्लिश होणार व्हॉइस नोट, ‘अशा’प्रकारे शेअर करा Voice Status
HIGHLIGHTS

युजर्स व्हॉट्सऍप स्टेटसमध्ये त्यांच्या व्हॉइस नोट्स पब्लिश करू शकतात.

याबाबत प्रायव्हसी सेटिंग सामान्य WhatsApp स्टेटससारखीच आहे.

व्हॉट्सऍप स्टेटस सेक्शनमध्ये तुम्हाला नवीन 'पेन्सिल' आयकॉन दिसेल.

WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर रोज नवनवीन फीचर्स आणत आहे. अलीकडेच ऍपने आपल्या स्टेटस फीचरमध्ये मोठे अपग्रेड केले आहे. युजर्स स्टेटसद्वारे फोटो आणि व्हिडिओ अपडेट करून स्वतःबद्दल माहिती आपल्या संपर्कांसोबत शेअर करत असतात. आता याव्यतिरिक्त युजर्स व्हॉट्सऍप स्टेटसमध्ये त्यांच्या व्हॉइस नोट्स पब्लिश करू शकतात. हे फीचर अखेर भारतात अँड्रॉइड आणि iOS वापरकर्त्यांसाठी रिलीज झाले आहे.

जर तुम्हाला तुमच्या सर्व कॉन्टॅक्टसोबत व्हॉट्सऍप व्हॉईस स्टेटस शेअर करायचे नसेल, तर याबाबत प्रायव्हसी सेटिंग सामान्य WhatsApp स्टेटससारखीच आहे. यात देखील तुम्हाला "My contacts, My contacts except Only share with" असे तीन पर्याय मिळणार आहे.

तुमच्या WhatsaApp स्टेटसला व्हॉइस नोट कसे लावायचे ? 

– सर्वप्रथम तुमच्या Android किंवा iOS स्मार्टफोनवर WhatsApp ओपन करा. 

– त्यानंतर व्हॉट्सऍप स्टेटस सेक्शनमध्ये जा.

– येथे तुम्हाला नवीन 'पेन्सिल' आयकॉन दिसेल.

– व्हॉइस स्टेटस अपलोड करण्यासाठी पेन्सिल आयकॉनवर क्लिक करा.

– आता बॉटमला तुम्हाला मायक्रोफोन आयकॉन दिसेल. यावर प्रेस करून तुमचे व्हॉइस स्टेटस रेकॉर्ड करा.

– स्टेटस रेकॉर्ड केल्यानंतर, त्याच्या पुढील 'Status (Contacts)' वर क्लिक करा.

– आता तुम्हाला ज्या संपर्कांना व्हॉइस नोट शेअर करायची आहे, ते पर्याय निवडा. 

– त्यानंतर 'Done' वर क्लिक करा. यासह तुमचे व्हॉइस स्टेटस अपलोड होईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo