How to: आता Instagram वर देखील पाठवता येईल Live लोकेशन, जाणून घ्या अगदी सोपी प्रक्रिया
Instagram एक लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे.
रील हे Instagram ॲपचे सर्वात प्रसिद्ध फिचर आहे.
Instagram ने अलीकडेच आपल्या वापरकर्त्यांसाठी लाइव्ह लोकेशन शेअरिंग फीचर आणले आहे.
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram एक लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. रील हे या ॲपचे सर्वात प्रसिद्ध फिचर आहे, जे सर्व वापरकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. तरुणाईमध्ये रील्स बनवण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Instagram ने अलीकडेच आपल्या वापरकर्त्यांसाठी लाइव्ह लोकेशन शेअरिंग फीचर आणले आहे. या फीचरद्वारे तुम्ही तुमचे लाईव्ह लोकेशन तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना Instagram मध्ये देखील पाठवू शकता.
Also Read: Best Smartwatches Under 3000: प्रीमियम लूकसह कमी किमतीत सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉच, पहा यादी
Instagram Live Location
Instagram च्या नवीन लाइव्ह लोकेशन फीचरद्वारे तुम्ही इंस्टाग्रामवर तुमच्या मित्रांसोबत 1 तासापर्यंतचे तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करण्यास सक्षम असाल. जर एखाद्या व्यतीकडे तुम्हाला पर्सनल नंबर शेअर न करता भेटायचे असेल तर, विशिष्ट ठिकाणी मित्रांना भेटताना हे फिचर उपयुक्त आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, तुम्ही हे फीचर फक्त DM मध्ये वापरू शकता. याशिवाय, हे फीचर वन-टू-वन चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये कार्य करेल.
इंस्टाग्रामवर लाईव्ह लोकेशन शेअर कसे कराल?
- सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनवर Instagram ॲप इन्स्टॉल करा. यानंतर DM विभागात जा.
- यानंतर, चॅट ओपन करा ज्यावर तुम्हाला तुमचे लाइव्ह लोकेशन पाठवायचे आहे.
- आता तुम्हाला टेक्स्ट बारवर जावे लागेल. येथे तुम्हाला रेकॉर्डिंग, फोटो, इमोजीच्या पुढील + आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुमच्यासमोर लोकेशन आणि इमॅजिन असे दोन पर्याय दिसतील. लोकेशन पाठवण्यासाठी तुम्ही लोकेशन ऑप्शनवर टॅप करा.
- येथे Find a Place या ऑप्शनवर जाऊन तुम्ही ठिकाण शोधू शकता. याशिवाय सेंड पिन केलेले लोकेशनचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
- हा पर्याय मॅपवर पिन लोकेशन पाठविण्यासाठी वापरला जातो.
- लोकेशन निवडल्यानंतर तुम्हाला ‘शेअर युअर लोकेशन’ ऑप्शनवर टॅप करावे लागेल. यानंतर तुमचे लोकेशन तुमच्या संपर्काला पाठवले जाईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile