Whatsapp वरून कशी कराल आपली अकाउंट इनफार्मेशन साठी रिक्वेस्ट आणि कशी कराल डाउनलोड
अशी मिळवा आपली व्हाट्सॅप अकाउंट ची इनफार्मेशन...
ट्रांसपेरेंसी वर भर देत व्हाट्सॅप आपल्या यूजर्सना त्यांच्या डाटा वर कंट्रोल करण्याचे स्वातंत्र्य देतो. आम्ही तुम्हाला काही वेळेपूर्वी सांगितले होते की आता तुम्ही व्हाट्सॅप वर जाऊन आपली अकाउंट इन्फो साठी रिक्वेस्ट करू शकता, तसेच ती डाउनलोड पण करू शकता. आम्ही तुम्हाला सांगितले होते की कंपनी ने एक नवीन फीचर सादर केला आहे, जो तुम्हाला असे करण्याचे स्वातंत्र्य देतो. हा नवीन फीचर जगभरातील व्हाट्सॅप यूजर्स साठी अॅप च्या नवीन वर्जन सोबत जारी करण्यात आला आहे.
हा नवीन फीचर येण्यासाठी 25 मे ला येणारा नवीन EU डाटा प्राइवेसी नियम पण असू शकतो. या नवीन रेगुलेशन मुळे यूजर्सना त्यांच्या डाटा वर जास्त कण्ट्रोल मिळणार आहे. याचा अर्थ असा यूजर्स आता आपल्या पर्सनल डाटा वर नजर ठेवू शकतील. या प्रोसेस ला सोप्पे बनवले आहे.
अकाउंट इनफार्मेशन साठी कशी कराल रिक्वेस्ट
या नवीन फीचर मध्ये, व्हाट्सॅप यूजर्स आपल्या अकाउंट इन्फो साठी रिक्वेस्ट करू शकता, त्याचबरोबर एक रिपोर्ट पण एक्सपोर्ट करू शकता. यात तुमचा प्रोफाइल फोटो आणि ग्रुप इत्यादी ची नावे येतात. पण याचा अर्थ असा नाही की तुमची चॅट हिस्ट्री पण तुम्हाला मिळेल. चला तर जाणून घेऊया कशी मिळवावी आपल्या व्हाट्सॅप अकाउंट ची इनफार्मेशन?
सर्वात आधी हे लक्षात असू दे की तुमच्याकडे व्हाट्सॅप चे नवीन वर्जन असावे. कंपनी ने सांगितले आहे की हा फीचर जगभरातील व्हाट्सऐप यूजर्स साठी जारी केले आहे. पण अजूनही तुम्हाला हा अपडेट आला नसेल तर तुम्हाला वाट बघावी लागेल. आता बघा कशी करावी तुमच्या अकाउंट इन्फो साठी रिक्वेस्ट :
1. यासाठी सर्वात आधी आपल्या व्हाट्सॅप अकाउंट वर जा
2. त्यानंतर व्हाट्सॅप सेटिंग मध्ये जा
3. अकाउंट वर क्लिक करा
4. आता तुम्हाला हा एक ऑप्शन मिळेल रिक्वेस्ट अकाउंट इन्फो, यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
5. या बटन वर क्लिक करताच, तुमची रिक्वेस्ट ऑटोमॅटिकली व्हाट्सॅप कडे पोचेल आणि तुम्हाला जवळपास तीन दिवसांमध्ये एक रिपोर्ट मिळेल.
कसा डाउनलोड कराल हा रिपोर्ट
जेव्हा तुम्ही या डाटा साठी रिक्वेस्ट करता, तेव्हा यावर काम सुरू होते. तुम्हाला जवळपास तीन दिवसांमध्ये हा रिपोर्ट मिळतो. तेव्हा तुम्ही हा डाउनलोड करू शकता. पण त्याआधी तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर व्हाट्सॅप कडून एक टाइम पण दिला जातो हा रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी. कारण काही वेळात हा रिपोर्ट डिलीट होतो. तुम्हाला हा रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मिळतो.
हा रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
1. सर्वात आधी व्हाट्सऐप सेटिंग मध्ये जा
2. त्यानंतर अकाउंट मध्ये जाऊन रिक्वेस्ट अकाउंट इन्फो वर जा.
3. तिथे तुम्हाला एक डाउनलोड रिपोर्ट टॅब मिळेल, ही एक ZIP फाइल आहे जी तुम्ही तुम्ही तुमच्या फोन मध्ये डाउनलोड करू शकता.
4. या ZIP फाइल मध्ये एक HTML फाइल आहे आणि यात एक JSON फाइल पण मिळेल तुम्हाला. हा रिपोर्ट तुम्हाला एक्सपोर्ट रिपोर्ट वर क्लिक करून आपल्या फोन मध्ये घ्यावे लागेल.
लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे हा रिपोर्ट तुम्हाला व्हाट्सॅप मध्ये दिसणार नाही. यासाठी तुम्हाला इतर थर्ड पार्टी अॅप वापरावा लागेल. याची कॉपी डिलीट केल्याने तुमच्या अकाउंट डाटा वर काहीही परिणाम होत नाही.