लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी दररोज नवीन अपग्रेड आणि नवीन फीचर्स आणत असतो. सुरुवातीला WhatsApp वर मेसेज पाठवल्यानंतर तो डिलीट करता येत नव्हता. मात्र, आता काही काळापूर्वी ही सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. मेसेज पाठवल्यानंतर तुम्ही प्रत्येकाच्या चॅटमधून मेसेज डिलीट करू शकता.
अनेकदा संपर्क तुम्हाला मॅसेजेस पाठवतात आणि लगेच डिलीट करतात. असे मॅसेजेस लोक गंमत म्हणून किंवा एखादी वैयक्तिक माहिती म्हणून देखील पाठवतात. जर तुमच्याकडून हे मॅसेजेस चुकले असतील आणि तुम्हाला ते वाचायचे असतील तर, डिलीट केलेले मेसेज तुम्ही एक सोपी युक्तीद्वारे सहज वाचू शकता.
Also Read: Nothing लवकरच लाँच करणार आपला नवा स्मार्टफोन! टीजर पोस्टरमध्ये बघा पहिली झलक। Tech News
लक्षात घ्या की, WhatsApp वर डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपचा आधार घ्यावा लागणार नाही. डिलीट केलेल्या मॅसेजची माहिती तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्येच मिळेल. पुढील सोपी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा.
या महत्त्वाच्या सेटिंगद्वारे तुम्ही डिलीटेड मॅसेज सहज बघू शकता. केवळ WhatsApp च नाही तर या विंडोमध्ये तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर येणारे सर्व नोटिफिकेशन्स बघू शकता. डिलीट केलेले मेसेज वाचण्याची ही एक अतिशय सोपी युक्ती आहे. या सोप्या युक्तीद्वारे तुम्हाला कुणालाही ‘डिलीटेड मॅसेजमध्ये काय लिहलं होत?’ असे विचारण्याची गरज येणार नाही.