लोकप्रिय सोशल मीडिया साइट Facebook वरील तुमचे अकाउंट डिलीट करायचे आहे तर, वापरकर्त्यांना अकाउंट डिलीट आणि निष्क्रिय करण्याचा पर्याय मिळतो. निष्क्रिय करणे म्हणजे तुम्ही तुमचे खाते निष्क्रिय केल्यास, ते पुन्हा सक्रिय करू शकता. जर तुमचे खाते एकदा डिलीट झाले तर तुमच्या पोस्ट, फोटो, व्हिडिओ आणि कमेंट्स तुमच्या खात्यासह Facebook वरून नेहमीकरता रिमूव्ह करू शकता.
काही वेळा असं होते की, फेसबुकवर तुम्ही तुमच्या प्रायव्हसीबद्दल चिंतीत असता, त्यामुळे तुम्हाला तुमचे अकाउंट डिलीट आणि निष्क्रिय करायचे असते. आणि याद्वारे तुम्ही सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवू इच्छित आहात. चला तर मग जाणून घेउयात फेसबुक अकाउंट डिअॅक्टिव्हेट आणि डिलीट करण्याची प्रक्रिया बघुयात.
– सर्वप्रथम फेसबुक अकाउंटला लॉग इन करा.
– आता तुम्हाला सेटिंग्ज आणि प्रायव्हसीमध्ये जावे लागेल.
– येथे तुम्हाला Settings and Security चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे लागेल.
– आता तुम्हाला Privacy वर क्लिक करावे लागेल.
– येथे Facebook Information या पर्यायावर क्लिक करा.
– आता तुम्हाला सर्वात शेवटी Deactivation आणि Deletion चा पर्याय दिसेल.
– आता जर तुम्हाला Deactivate करायचे असेल तर या पर्यायावर क्लिक करा. आणि Delete करायचे असले तर यावर क्लिक करा.
मात्र हे लक्षात घ्या की, तुमचे खाते निष्क्रिय केल्यानंतर तुम्हाला भविष्यात तुमचे खाते सक्रिय करता येणार आहे. मात्र, जर एकदा तुम्ही Facebook खाते डिलीट केले तर, तुम्ही भविष्यात पुन्हा Facebook खाते सक्रिय करू शकणार नाही. तुमचा फेसबुकवरील पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ यांसारखा डेटाही हटवला जाईल. जर तुम्हाला परत फेसबुक युज करायचे असेल तर, तुम्हाला नवीन खाते तयार करावे लागेल.