How to: अगदी सोप्या रीतीने बनवा WhatsApp Channels, पंतप्रधान Narendra Modi यांना देखील फॉलो करा। Tech News

How to: अगदी सोप्या रीतीने बनवा WhatsApp Channels, पंतप्रधान Narendra Modi यांना देखील फॉलो करा। Tech News
HIGHLIGHTS

WhatsApp ने नुकतेच भारतीय वापरकर्त्यांसाठी 'Channels' फीचर आणले आहे.

WhatsApp चे नवीन 'चॅनल्स' फिचर हे वन वे ब्रॉडकास्ट टूल आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही WhatsApp चॅनल्समध्ये सहभागी झाले आहेत.

WhatsApp ने नुकतेच भारतीय वापरकर्त्यांसाठी 'Channels' फीचर आणले आहे. या नवीन फिचरद्वारे वापरकर्ते थेट लोकांच्या जागा किंवा त्यांच्या आवडीच्या ऑर्गनायझेशनमध्ये सामील होऊ शकतात. तसेच त्यांच्याबद्दल सर्व अपडेट्स प्राप्त करू शकतात. येथे तुम्ही मजकूर, इमेजेस, व्हिडिओ, स्टिकर्स आणि लिंक्स अमर्यादित वापरकर्त्यांसोबत शेअर करू शकता. चॅनेलचा 'अपडेट्स' नावाचा स्वतःचा टॅब असतो, जो तुमच्या चॅट्सपासून वेगळा असतो. त्यात तुम्हाला स्टेटस आणि चॅनेल्स असे दोन पर्याय दिसतील. 

WhatsApp Channels

WhatsApp चे नवीन 'चॅनल्स' फिचर हे वन वे ब्रॉडकास्ट टूल आहे, जे वापरकर्त्यांना एकाच वेळी मोठ्या ऑडियन्सना अपडेट पाठवू देते. या नवीन फिचरचा वापर बातम्या, घोषणा आणि माहिती शेअर करण्यासाठी करता येईल. ही माहिती इंडिविज्युअल्स, कंपन्या आणि ऑर्गनायजेशन या फीचरद्वारे शेर करू शकतात. 

whatsapp channels

WhatsApp Channels बनवण्याची सोपी प्रक्रिया 

तुमच्या स्मार्टफोनवर चॅनेल तयार करण्यासाठी, पुढील प्रक्रिया फॉलो करा:

– WhatsApp उघडा आणि अपडेट्स टॅबवर जा. 

– प्लस '+' चिन्हावर क्लिक करा आणि नंतर 'नवीन चॅनल' निवडा.

– यानंतर चॅनेलचे नाव आणि वर्णन टाका.

– चॅनेल चिन्ह जोडा. (ही स्टेप पर्यायी आहे.) 

– शेवटी Create Channel वर क्लिक करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही करा फॉलो 

WhatsApp वर Channels फीचर सुरू झाल्यानंतर लगेच काही सेलिब्रिटींनी हे फिचर वापरण्यास सुरुवात केली. आता काही दिवसांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही WhatsApp चॅनल्समध्ये सहभागी झाले आहेत. व्हॉट्सऍप वापरकर्त्यांना पंतप्रधानांनी पोस्ट केलेले सर्व अपडेट्स चॅनेलवर मिळू शकतात. "व्हॉट्सऍप समुदायात सामील होताना मला खूप आनंद होत आहे! आमच्या सततच्या संभाषणाच्या प्रवासातील हे आणखी एक पाऊल आहे. चला इथेच कनेक्ट राहूया!"  असे पंतप्रधान व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवरील त्यांच्या पहिल्या पोस्टमध्ये म्हणाले. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo