तुम्हाला ट्रेनने प्रवास करावा लागतो ? आता घरी बसून WhatsApp वर तुम्हाला ट्रेनशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळणार आहे. खरं तर, मुंबईस्थित स्टार्टअप Railofy ने एक चॅटबॉट विकसित केला आहे, जो भारतीय रेल्वे प्रवाशांना WhatsApp वर PNR स्टेटस आणि रिअल-टाइम स्टेटस तपासण्याची परवानगी देतो. ज्यांना ट्रेनचे तपशील तपासण्यासाठी बरेच ऍप्स डाउनलोड करायचे नाहीत त्यांच्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरेल.
WhatsApp वर PNR आणि लाइव्ह ट्रेन स्टेटस तपासण्यासाठी, तुम्हाला फक्त एक युनिक नंबर सेव्ह करायचा आहे आणि चॅटबॉटमध्ये 10-अंकी PNR नंबर टाकायचा आहे. PNR स्टेटसचा मागोवा घेण्यासाठी आणि WhatsApp वर लाईव्ह लोकेशन ट्रॅक करण्यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया स्पष्ट केली आहे.
हे सुद्धा वाचा : Krrish 4: हृतिकचा 'क्रिश 4' 'ब्रह्मास्त्र'ला टक्कर देईल का? दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या VFX वर दिला मोठा इशारा
स्टेप 1: तुमच्या स्मार्टफोनच्या संपर्क यादीमध्ये Railofy चा ट्रेन चौकशी क्रमांक (+91-9881193322) सेव्ह करा.
स्टेप 2: आता, WhatsApp उघडा आणि तुम्ही आधी सेव्ह केलेल्या Relofi च्या चॅटबॉट नंबरच्या चॅट विंडोवर जा.
स्टेप 3: तुमच्या ट्रेनचा 10 अंकी PNR नंबर टाइप करा आणि Send वर टॅप करा.
स्टेप 4: आता Railofi चॅटबॉट तुम्हाला PNR स्टेटस, ट्रेन स्टेटस आणि अलर्ट यासारखे तपशील पाठवेल.
स्टेप 5: चॅटबॉट आता तुम्हाला WhatsApp वर रिअल-टाइम ट्रेन स्टेटस पाठवेल.