How to: नंबर सेव्ह न करता WhatsAppवर चॅट कसे करायचे? ‘अशा’प्रकारे अगदी सोपी आहे पद्धत। Tech News
भारतात जवळपास 56 कोटी लोक WhatsApp वापरत आहेत.
WhatsApp आपल्या युजर्सच्या प्रायव्हसी आणि सिक्योरिटीची उत्तमरीत्या काळजी घेतो.
नंबर सेव्ह न करता WhatsApp वर चॅट करण्याचा सर्वात सोपा मार्ग
लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग App म्हणजेच WhatsApp आज जगभरात दोन अब्जाहून अधिक लोक वापरतात. फक्त भारतातच 56 कोटी लोक WhatsApp वापरत आहेत. WhatsApp आपल्या युजर्सच्या प्रायव्हसी आणि सिक्योरिटीची उत्तमरीत्या काळजी घेतो. परंतु, प्लॅटफॉर्मवर चॅटिंग करताना सर्वात मोठी समस्या म्हणजे नवीन किंवा अनोळखी नंबरवर चॅट करणे होय. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला नंबर सेव्ह न करता WhatsApp वर चॅट करण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगणार आहोत.
हे सुद्धा वाचा: Amazon Great Indian Festival Sale 2023: 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत 5G स्मार्टफोन उपलब्ध, बघा Best डील्स
नंबर सेव्ह न करता WhatsAppवर चॅट करा.
सर्वप्रथम लक्षात घ्या की, यासाठी तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी ऍप डाउनलोड करण्याची गरज नाही. हे काम तुम्ही अगदी सहजपणे करू शकता. बघा स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया पुढीलप्रमाणे:
- सर्वप्रथम तुम्हाला WhatsApp अपडेट करावे लागेल.
- यानंतर चॅट सेक्शनवर जा आणि New Chat वर क्लिक करा.
- आता तुम्हाला ज्या क्रमांकावर चॅट करायचे आहे, तो नंबर टाइप करा.
- तुम्ही नंबर टाइप करताच तुम्हाला त्या नंबरचे WhatsApp अकाउंट बॉटमला दिसेल.
अशाप्रकारे, आता त्यावर टॅप करून आणि चॅटिंगला सुरुवात करा.
नंबर सेव्ह न करता WhatsAppवर चॅट करण्याची आणखी एक पद्धत
दुसरा मार्ग म्हणजे तुम्हाला ज्या नंबरवर चॅट करायचे आहे, तो नंबर टाईप करून WhatsApp वर स्वतःला पाठवा. त्यानंतर तुम्ही त्या नंबरवर टॅप करताच त्याचे चॅट ओपन होईल. यानंतर तुम्ही नंबर सेव्ह न करता अगदी सहजरोट्या चॅट करू शकता.
अपकमिंग WhatsApp फिचर
आता मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग App एका फिचरवर काम करत आहे, जे सिक्रेट कोड वापरून लॉक केलेल्या चॅट्स उघडण्याची परवानगी देईल. याचा अर्थ असा की एखाद्याला तुमच्या फोनचा पासवर्ड माहित असला तरी तो तुमचे लॉक केलेले WhatsApp चॅट उघडू शकणार नाही. या फिचरला WhatsApp ने ‘WhatsApp Secret Code’ असे नाव दिले आहे. हे फिचर लवकरच सर्व युजर्ससाठी रोलआऊट होणार आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile