Netflix सिनेरसिकांचे आवडते OTT प्लॅटफॉर्म आहे. यावर बरेच चित्रपट, नवीन रिलीज, वेब सिरीज तसेच नेटफ्लिक्स ओरिजनल्स इ. अनेक कंटेंट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध आहे. मात्र, यासाठी तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मचे सब्स्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे.
सब्स्क्रिप्शन घेताना बँक अकाउंट तपशील किंवा पेमेंट मेथड ऍड करावे लागते. जर तुमच्या सब्स्क्रिप्शनची व्हॅलिडिटी संपली तर नंतर ते आपोआप रिन्यू होते. अशा वेळी बरेचदा तुमचे पैसे कट होतात. म्हणून, ग्राहकांना सब्स्क्रिप्शन रद्द करण्याचा पर्याय दिला गेला आहे. तुम्हला जर मेंबरशिप कॅन्सल करण्याची प्रक्रिया माहिती नसेल तर काळजी करू नका. पुढीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया वाचा.
– सर्वप्रथम NETFLIX तुमच्या डिवाइसवर ओपन करा. त्यानंतर उजव्या कोपऱ्यातील प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
– आता हॅमबर्ग आयकॉनवर क्लिक करा.
– यानंतर Account मध्ये जा. आता तुमच्या समोर संपूर्ण तपशील येईल.
– तुम्हाला यात बिलिंग डिटेल्स मध्ये कॅन्सल मेम्बरशिपचे ऑप्शन मिळेल.
– त्यानंतर कन्फर्म बटन वर क्लिक करून मेम्बरशिप कॅन्सल करा.
सब्स्क्रिप्शन रद्द केल्यावरही तुमचे अकाउंट वैधतेच्या शेवटच्या दिवसापर्यंत ऍक्टिव्ह राहील. मेंबरशिप कॅन्सल केल्याने केवळ ऑटो पेमेंट होणार नाही. बाकी तुमचे कुठलेही नुकसान होणार नाही. त्यानंतर, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सब्स्क्रिप्शन पुन्हा घेऊ शकता.