दिवाळीचे औचित्य साधून हाइक १०० पेक्षा जास्त ब्रँडवर देणार विशेष सूट
हाइकद्वारा सादर केल्या गेलेल्या ह्या कूपनच्या माध्यमातून १०० पेक्षा जास्त टॉप ब्रँडच्या खरेदीवर जबरदस्त सूट मिळणार आहे. ह्यात अॅमेझॉन, ईबे, जबॉँग, आस्क मी बाजार आणि पिज्जा हट यांचा समावेश आहे.
त्वरित मेसेजिंग प्लेटफॉर्म हाइकने दिवाळीचे औचित्य साधून आपल्या यूजर्ससाठी खास ऑफर्स आणले आहे. ह्या ऑफरच्या अंतर्गत कंपनीने कूपन लाँच केले आहे. ज्याच्या माध्यमातून ग्राहक डिस्काउंट चा फायदा घेऊ शकतात.
हाइकच्या ह्या कूपनचा उपयोग ग्राहक शॉपिंग आणि गिफ्ट्स खरेदी करण्याशिवाय आपल्या पसंतीच्या रेस्टॉरंटमध्ये डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात. हाइकने हे कूपन्स मिळवणे आणि ह्याचा उपयोग करणे अगदी सोपे केले आहे. अॅप्लीकेशनचे यूजर इंटरफेसवरच हाइक मेसेंजर उघडून कुपन्सवर क्लिक करुन ह्याचा वापर करण्याचा विकल्प दिला गेला आहे.
ह्यात आपल्याला डिस्काउंटसाठी अनेक ब्रँड उपलब्ध होतील, त्यातील तुम्ही हवा तो निवडू शकता. ग्राहकांनी केवळ ‘गेट कूपन कोड’वर क्लिक करा आणि मोबाईल किेंवा वेबसाइटवर त्या ब्रँडला उघडून त्याचा लाभ घ्या. आपण हाइकद्वारा सादर केलेल्या कूपनच्या माध्यमातून १०० पेक्षा जास्त टॉप ब्रँडच्या खरेदीवर जबरदस्त सूट मिळणार आहे. ह्यात अॅमेझॉन, ईबे, जबॉँग, आस्क मी बाजार आणि पिज्जा हट यांचा समावेश आहे.
हाइक भारती तसेच सॉफ्टबँकचे संयुक्त उपक्रम आहे. हाइकने हल्लीच घोषणा केली होती की, कंपनीचे ७० मिलियनपेक्षा जास्त ग्राहक आहेत. जे की प्रत्येक आठवडयात १४० मिनिट हाइकवर असतात. ह्या सेवेमध्ये मेसेजशिवाय बातम्या आणि क्रिकेट स्कोर्ससु्द्धा समाविष्ट आहेत.
Team Digit
Team Digit is made up of some of the most experienced and geekiest technology editors in India! View Full Profile