आता Hike वर इंटरनेटशिवायही करु शकता मेसेजिंग
हाइकने काही दिवसांपूर्वीच आपल्या यूजर्ससाठी Hike Direct नावाची एक सेवा सुरु केली. ज्याच्या माध्यमातून इंटरनेटशिवाय आपण मेसेजिंग करु शकता.
सध्या त्वरित चॅटिंग किंवा मेसेजिंगच्या दुनियेत व्हाट्सअॅप अॅपची चलती आहे. त्यामुळे त्याला टक्कर देण्यासाठी त्याचे इतर प्रतिस्पर्धी मेसेजिंग अॅप्स कसोशीने प्रयत्न करताना दिसतात. त्याच मार्गावर एक पाऊल पुढे टाकून आता Hike ने एक नवीन फीचर लाँच केला आहे, ज्याचे नाव आहे Hike Direct. ह्याच्या माध्यमातून आपण इंटरनेटशिवाय चॅटिंग करु शकता. एवढच नाही, तर आपण इंटरनेटशिवाय फोटो, स्टीकर, फाइल्ससुद्धा पाठवू शकता. अट फक्त एवढीच आहे की, दोन्ही यूजर्स चॅटिंग करत असताना Hike नेटवर्कवर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दोन्ही यूजर्समधील अंतर हे १०० मीटरपेक्षा जास्त असता कामा नये.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, हाइक मेसेजिंग अॅपमध्ये दरवर्षी १०० टक्क्यांपेक्षा जास्त नफा होत आहे, त्याचबरोबर कंपनी असेही सांगतेय की, त्याच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात २०० करोड मेसेज पाठवले जातात आणि घेतले जातात.
ह्याआधी Hike ने आपला ग्रुप कॉलिंग फीचर आणला होता. त्याच्या माध्यमातून १०० लोक एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात. ह्याच फीचरला हाइकच्या लेटेस्ट व्हर्जनला अपग्रेड करुन घेता येऊ शकते. हा गुगल प्ले स्टोरवर आजपासून उपलब्ध होईल. कॉलिंग फीचर 4G आणि वायफायवर काम करतो. आणि सध्यातरी ह्याची सुरुवात अॅनड्रॉईड स्मार्टफोनपासून केली गेली आहे. ह्याला ह्यावर्षाच्या शेवटपर्यंत आयओएस आणि विंडो प्लेटफॉर्मवर आणले जाईल. कंपनीने सांगितले आहे की, ग्रुप कॉलिंग फीचर विद्यार्थी आणि कुटूंबांना समोर ठेवून लाँच केले गेले आहे, जे ग्रुप चॅट करणे पसंत करतात.
त्याचबरोबर हाइक मॅसेंजरचे फाउंडर आणि सीईओ केवीन भारती मित्तल यांनी असे विधान केले आहे की, आता आपण एक बटण दाबून एल कॉलमध्ये १०० लोकांशी जोडू शकता.
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile