नवीन WhatsApp स्कॅमपासून सावध रहा: बघा काय आहे ‘Hi Mum’ स्कॅम…

Updated on 21-Dec-2022
HIGHLIGHTS

जगभरात सायबर स्कॅम वाढत आहेत, ज्यात स्कॅमर्स पीडितांना फसवून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढतात.

ऑस्ट्रेलियातून एका नव्या स्कॅमचा अहवाल समोर येत आहे.

2022 मध्ये सुमारे 11,100 लोक 'Hi Mum' स्कॅमचे बळी ठरले आहेत.

सायबर मनी फ्रॉडच्या अशा अनेक घटना जगभरात समोर येत आहेत, ज्यात घोटाळेबाज पीडितांना त्यांच्या बोलण्याने आमिष दाखवून त्यांची बँक खाती रिकामे करतात. ऑस्ट्रेलियातून 'Hi Mum' घोटाळ्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत, ज्यात 1,150 हून अधिक लोक बळी पडले आहेत.

हे सुद्धा वाचा : AIRTEL : 60 दिवसांची वैधतेसह मिळेल दररोज 1.5GB इंटरनेट, जाणून घ्या किंमत

जगभरात सायबर मनी फ्रॉड वाढत आहे. अशा अनेक घटना आपण पाहत आहोत, ज्यात घोटाळेबाज लोकांना भुरळ घालतात आणि नंतर त्यांची बँक खाती रिकामी करतात. मग तो ATM स्कॅम असो, UPI स्कॅम किंवा सिम स्वॅप स्कॅम असो. आता आम्ही एका नवीन घोटाळ्याच्या बातम्या पाहत आहोत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियातून एक नवीन प्रकरण समोर येत आहे. यामध्ये, स्कॅमर्स पीडितांच्या कुटुंबातील सदस्य असल्याचे दाखवून मोबाईल हरवण्याच्या बहाण्याने पैसे पाठवण्यास सांगतात.

काय आहे 'HI MUM' स्कॅम?

अहवालानुसार, स्कॅमर्स पीडितांना व्हॉट्सऍपवर संपर्क करतात आणि दावा करतात की, त्यांचा फोन हरवला आहे किंवा खराब झाला आहे आणि आता ते एका नवीन नंबरवरून संपर्क करत आहेत. एकदा का त्यांनी पीडितांचा विश्वास जिंकला, त्यानंतर ते त्यांच्याकडून काही वैयक्तिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. जसे की, त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलचे फोटो आणि तातडीचे बिल किंवा फोन बदलण्यासाठी पैसे मागतात.

मग ते तुम्हाला निधीची आवश्यकता दर्शवतात आणि म्हणतात की ते त्यांच्या कार्डद्वारे प्रवेश करू शकत नाहीत कारण त्यांची ऑनलाइन बँकिंग तात्पुरती बंद आहे किंवा काही त्रुटी दर्शवित आहे. 'हाय मम' स्कॅममध्ये लक्षणीय वाढ झाली असून 1,150 हून अधिक लोक या स्कॅमला बळी पडले आहेत, असा अहवाल 'ऑस्ट्रेलियन ग्राहक आणि स्पर्धा आयोग' (ACCC) ने दिला आहे. गेल्या काही महिन्यांत लोकांनी सुमारे $2.6 (अंदाजे 21 कोटी रुपये) गमावले आहेत. एकट्या 2022 मध्ये, अंदाजे 11,100 पीडितांच्या बँक खात्यांमधून $7.2 दशलक्ष (अंदाजे 57.84 कोटी रुपये) चोरीला गेले आहेत. सर्वाधिक घोटाळ्याची प्रकरणे 55 वर्षांवरील महिलांनी नोंदवली आहेत.

हे प्रकरण ऑस्ट्रेलियात नोंदवले गेले असले तरी भारतीयांसाठीही हा इशारा आहे. कारण भारतातही गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अलीकडेच दिल्लीतील एका व्यावसायिकाला फसवून त्याच्या काही बँक खात्यांमधून सुमारे 50 लाख रुपये काढण्यात आले. सिम स्वॅपिंग, QR कोड स्कॅम आणि फिशिंग स्कॅम अशी अनेक प्रकरणे व्हायरल होत आहेत. त्यामुळे अशा सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी सावधगिरी बाळगणे आणि जागरूक राहणे आवश्यक आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :