विंडोज 10 वर आता लवकरच Here Maps ची सुविधा मिळणे बंद होणार आहे. खरे पाहता, Here Maps ने विंडोज 10 वर सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने अशी माहिती दिली आहे की, विंडोज 10 स्टोअरवर २९ मार्चपासून हा अॅप उपलब्ध होणार नाही. तसेच ३० जूननंतर विंडोज 10 वर हा अॅप काम करणे बंद करेल.
Here Maps अॅप विंडोज फोन 8 वर चालणा-या डिवाइसर काम करत राहील, मात्र ह्यावरही हा अॅपचे काही मर्यादित फीचर्स उपलब्ध राहतील.
कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉगवर एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. ह्या पोस्टनुसार, कंपनीने हा निर्णय घेण्यामागचे कारण म्हणजे विंडोज 10 साठी कंपनीला ह्या अॅपला सुरुवातीपासून बनवावे लागले असते.
Here Maps अशा काही एक्सक्लूसिव सर्विसेसमधील एक आहे, जो विंडोज फोनच्या लाँचवेळी फोनवर मिळत आहे. ह्या अॅपमुळे ऑफलाइन झाले तरीही दिशानिर्देश मिळतात.
हेदेखील वाचा – मायक्रोमॅक्स सरफेस प्रो 3 टॅबलेटच्या किंमतीतही झाली घसरण, ५८,९९० रुपयात उपलब्ध
हेदेखील वाचा – जिओनी W909 Clamshell स्मार्टफोन 29 मार्चला होऊ शकतो लाँच