गुगल ट्रान्सलेटच्या माध्यमातून आता आपण ऑफलाइन मोडवर 103 भाषांचे अनुवाद करु शकाल.
गुगलने आपल्या ट्रान्सलेट अॅपमध्ये एक नवीन फीचर आणले आहे, जे “टॅप टू ट्रान्सलेट” नावाने जारी केले आहे. ह्याच्या माध्यमातून आपण कोणत्याही अॅपमध्ये गुगल ट्रान्सलेंटमध्ये स्विच केल्याशिवाय भाषांतर करु शकता. हे नवीन फीचर अॅनड्रॉईड क्लिपबोर्डमध्ये वापरले जाईल. त्यासाठी यूजर्सला केवळ मजकूर कॉपी करावा लागेल आणि ट्रान्सलेट पर्यायामध्ये जाऊन पेस्ट करावे लागेल. त्याने त्वरित ते टेक्स भाषांतरित केले जाईल आणि अॅनड्रॉईडच्या कोणत्याही जेलीबिन v4.2 किंवा त्याच्या पुढील व्हर्जनवर काम करेल. हे सांगणे अवघड आहे की, हे फीचर IOS यूजर्ससाठी कधीपर्यंत उपलब्ध होईल.
त्याशिवाय गुगलने अशीही घोषणा केली आहे की, गुगल ट्रान्सलेट iOS डिवाइसवर ऑफलाइन मोडवर काम करेल. ह्या नवीन मोडने आता ५२ भाषांना ऑफलाइन भाषांतरित केले जाईल. कोणत्याही भाषेसाठी पॅकेज डाऊनलोड करण्यासाठी केवळ त्या भाषेचे नाव पुढे दिलेल्या अॅरोवर क्लिक करावे लागेल, ज्यानंतर ऑफलाइन राहूनसुद्धा ट्रान्सलेशन केले जाईल. ही भाषा पॅकेज 25MB आकार आहे.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या भारत यात्रा दरम्यान गुगलचे CEO सुंदर पिचाय यांनी सांगितले होते की, कंपनी अनेक फीचर लाँच करण्याच्या तयारित लागले आहेत, ज्यात टॅप टू ट्रान्सलेट अॅपसुद्धा सामील होते.