SBI आणि गूगल तेज आले एकत्र, आता यूजर्स बनवू शकतील @oksbi UPI आयडी

SBI आणि गूगल तेज आले एकत्र, आता यूजर्स बनवू शकतील @oksbi UPI आयडी
HIGHLIGHTS

आता यूजर्स @ oksbi UPI आयडी बनवू शकतील आणि सोबतच SBI कस्टमर्स एक्सक्लूसिव ऑफर्स चा पण फायदा घेऊ शकतील.

Google ने मंगळवारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सोबत आपल्या डिजिटल पेमेंट अॅप "तेज" ला जोडण्याची घोषणा केली आहे. आता यूजर्स @ oksbi UPI आयडी बनवू शकतील आणि सोबतच SBI कस्टमर्स एक्सक्लूसिव ऑफर्स चा पण फायदा घेऊ शकतील.
मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये लॉन्च झालेला "Tez" अॅप ने आता पर्यंत 250 मिलियन पेक्षा जास्त ट्रांजेक्शन केले आहेत आणि पूर्ण देशात 13.5 मिलियन पेक्षा जास्त मासिक सक्रिय ग्राहक आहेत.
एसबीआय चे चेयरमन रजनीश कुमार ने सांगितले आहे की, "गूगल तेज सोबतची ही भागीदारी आमच्या 40 कोटी पेक्षा जास्त ग्राहकांना नवीन संधी देईल."
 
"तेज" यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) वर बनवला गेला आहे, ज्यातून तुम्ही आपल्या बँक अकाउंट मधून दुसर्‍या बँक अकाउंट मध्ये 70 पेक्षा अधिक यूपीआय-सक्षम बँकांमध्ये पेमेंट करण्याची सुविधा मिळते. हा अॅप इंग्रजी व्यतिरिक्त 7 अन्य भाषांमधे पण उपलब्ध आहे, ज्यात हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तमिल आणि तेलुगु चा समावेश आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo