गुगल मॅप्स हे लोकप्रिय नेव्हिगेशन ऍप आता तुमचे पैसे वाचवेल आणि यासाठी ऍपमध्ये नवीन फीचर समाविष्ट करण्यात आले आहे. नवीन फीचर वापरकर्त्यांना कमीत कमी इंधन खर्च करण्याचा मार्ग सांगेल. वापरकर्ते Google च्या मालकीच्या ऍपमध्ये कार इंजिनचा प्रकार निवडण्यास सक्षम असतील, ज्याद्वारे त्यांना सर्वोत्तम मार्ग सांगितला जाईल. वापरकर्ते गॅस, डिझेल, हायब्रिड किंवा इलेक्ट्रिक वाहन (EV) मधून निवड करू शकतील.
हे सुद्धा वाचा : BSNL चा हा प्लॅन 50 रुपयांपेक्षा कमी किमतीत कॉलिंग आणि डेटा ऑफर करतो, वाचा सविस्तर
उदाहरणार्थ, डिझेल इंजिन पेट्रोल आणि गॅस इंजिनपेक्षा जास्त वेगाने कमी इंधन वापरतात. दुसरीकडे, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक कार स्टॉप आणि गो ट्रॅफिकमध्ये कमी इंधन वापरतात. अशा प्रकारे इंजिनच्या प्रकारानुसार सर्वोत्तम मार्ग मॅप ऍपमध्ये दर्शविला जाईल. हा इंधन-बचत मार्ग वापरकर्त्यांना लीफ लेबलसह दर्शविला जाईल.
नवीन फीचरच्या उपलब्धतेबाबत गुगलने म्हटले आहे की, त्याची प्रथम युरोप, अमेरिका आणि कॅनडामध्ये चाचणी केली जाईल. मात्र, पुढील काही महिन्यांत, ते इतर बाजारपेठांमध्ये देखील आणले जाईल. कंपनीने म्हटले आहे की अमेरिकेत गेल्या वर्षी दिलेले इको-फ्रेंडली रूटिंग फिचर आता युरोपमधील सुमारे 40 देशांमध्ये आणले जाईल. याशिवाय, वापरकर्ते सर्वात कमी इंधन वापर आणि जलद मार्गांपैकी एक निवडण्यास सक्षम असतील.
गुगल मॅपच्या या नव्या फीचरचा फायदा त्या यूजर्सना मिळणार आहे, जे इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झाले आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांनाही चालना मिळत आहे आणि गुगलही या ट्रेंडला सपोर्ट करत आहे. EV चार्जिंग स्टेशन देखील लवकरच Google Maps वर वापरकर्त्यांना दाखवले जातील.