‘युट्यूब रेड’ सेवा च्या एका महिन्याच्या सदस्यत्वासाठी वापरकर्त्याला ९.९९ डॉलर (जवळपास ६३१ रुपये) द्यावे लागणार. एका मीडिया रिपोर्टच्या अनुसार ही सर्विस २८ ऑक्टोबरपासून अमेरिकेमध्ये सुरु केली जाईल आणि पुढील वर्षी ही जगभरात सादर केली जाईल.
जगातील सर्वात मोठी व्हिडियो साइट युट्यूबने व्हिडियो प्रेमींसाठी आपला एड-फ्री व्हर्जन लाँच केला आहे. ह्याचे नाव ‘यूट्युब रेड’ ठेवण्यात आले आहे, मात्र हे पेड व्हर्जन आहे. यूजरला हे वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील.
‘युट्यूब रेड’ सेवा च्या एका महिन्याच्या सदस्यत्वासाठी वापरकर्त्याला ९.९९ डॉलर (जवळपास ६३१ रुपये) द्यावे लागणार आहेत. एका मीडिया रिपोर्टच्या अनुसार ही सर्विस २८ ऑक्टोबरपासून अमेरिकेमध्ये सुरु केली जाईल आणि पुढील वर्षी ही जगभरात सादर केली जाईल. हे भारतात लाँच करण्यासंबंधी सध्या तरी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
ह्या सेेवेचे सदस्य झाल्यानंतर वापरकर्ते युट्यूब व्हिडियोज, युट्यूब गेमिंग अॅप्स आणि कंपनीच्या नवीन म्युझिक अॅप्सला वापरु शकतात. ही सेवा एड फ्री असेल. त्याचबरोबर वापरकर्त्याला विशेष सिरीज आणि चित्रपट पाहायला मिळतील. हे व्हिडियोज सामान्य वापरकर्त्याला उपलब्ध होणार नाही.
युट्यूब रेड हे मागील वर्षी कंपनीद्वारा लाँच केली गेलेली पेड सेवा ‘यूट्युब म्युझिक की’चे अपडेट व्हर्जन आहे. तरीही गुगल प्ले म्युझिक स्ट्रीमिंग सर्विस युट्यूब सर्विसपेक्षा वेगळी असेल. चांगली गोष्ट ही आहे की, गुगल प्ले म्युझिक स्ट्रीमिंग सर्विसचे युजर्स कंपनीच्या ह्या दोन सेवांचा वापर करु शकतात.