गूगल ने आपला Duo ऍप 2016 मध्ये सादर केला होता आणि आता या ऍप मध्ये लवकरच नवीन ग्रुप विडियो कॉलिंग आणि लो लाइट मोड समाविष्ट केला जाईल ज्यमुळे युजर एक्सपीरियंस चांगला होईल.
महत्वाचे मुद्दे
कमी प्रकाशात कॉलिंग साठी उपयोगी पडेल लो लाइट मोड
ग्रुप विडियो कॉलिंग मध्ये ऍड करता येइल 7 लोक
लवकरच ऍप मध्ये येऊ शकतात इतर अनेक चांगले फीचर्स
Google आपल्या विडियो चॅट मोबाईल ऍप डुओ साठी नवीन ग्रुप कॉलिंग फीचर आणि लो लाइट मोड आणण्यासाठी काम करत आहे. डुओ लॉन्च झाल्यानंतर पासूनच ग्रुप कॉलिंग फीचर खूप डिमांड मध्ये आहे. सध्या ऍपलचा फेस टाइम ऍप, स्काइप, फेसबुक मेसेंजर, आणि व्हाट्सऍप ग्रुप कॉलिंग ऑफर करतात. आणि आता हे फीचर Google Duo मध्ये पण येत आहे, Android Police च्या रिपोर्ट अनुसार, ऍप पर ग्रुप कॉलिंग मध्ये फक्त सात लोकांना ऍड केले जाऊ शकते. गूगल डुओ स्मार्टफोन युजर्स मध्ये खूप लोकप्रिय ऍप आहे आणि नुकतेच गूगल प्ले वर ऍप ने 1 बिलियन डाउनलोड्स पपूर्ण केले आहेत.
Android Police च्या रिपोर्ट अनुसार युजर्सना ऍप वर ग्रुप विडियो कॉलिंग साठी एक ग्रुप बनवावा लागेल ज्यात त्या युजर्सना ऍड करावे लागेल ज्यांना ग्रुप कॉल मध्ये सामील करायचे आहे आणि त्यांनतर कॉल केला जाऊ शकतो.
नवीन लो लाइट मोड च्या माध्यमातून युजर्स रात्रीच्या वेळी चालू असलेल्या संवादात एकमेकांना चांगल्या प्रकाशात बघू शकतात. पण युजर्सना हे नवीन फीचर्स कधी मिळतील हे अजून स्पष्ट झाले नाही. तुम्ही सहज याचा अपडेट को डाउनलोड करू शकत नाही. Engadget च्या रिपोर्ट अनुसार, येत्या काळात गूगल डुओ अनेक नवीन फीचर्स सह येऊ शकतो जे इतर विडियो वर आधारीत ऍप्सना टक्कर देतील.
गेल्या आठवड्यात Google Duo ऍप ने गूगल प्ले वर 1 बिलियन डाउनलोडचे लक्ष्य पार केले आहे. हा ऍप 2016 मध्ये Allo सोबत सादर केला गेला होता आणि आता Allo बंद करण्यात आला आहे.