Google युजर्सना झटका! रस्ता चुकलात तर आता तुम्हाला Googleची मदत घेता येणार नाही! ‘हे’ ऍप होणार बंद ?

Updated on 03-Nov-2022
HIGHLIGHTS

Google Street View बंद करण्याचा गुगलचा निर्णय

गुगलचे स्टँडअलोन 'स्ट्रीट व्ह्यू ऍप' ऍप स्टोअरवरून रिमूव्ह केले जात आहे.

Google चे हे ऍप बंद होण्यामागील कारण काय ?

Google कंपनीने अनेक स्मार्टफोन ऍप्स तयार केले आहेत, जे जगभरातील अनेक लोक वापरतात. या यादीत अशा काही ऍप्सची नावे देखील समाविष्ट आहेत, ज्यांचा उपयोग मार्ग दाखवण्यासाठी किंवा मार्ग शोधण्यासाठी केला जातो. चला जाणून घेऊयात की, गुगलने युजर्सना झटका देत कोणते ऍप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हे सुद्धा वाचा : Realme 10 Series मध्ये उत्कृष्ट डिस्प्लेसह मिळेल 108MP कॅमेरा, 9 नोव्हेंबर रोजी होणार लाँच

वाट चुकलात तर तुम्ही गुगलची मदत घेऊ शकणार नाही!

जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की आम्ही इथे कोणत्या ऍपबद्दल बोलत आहोत, तर आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही Google Maps नव्हे तर Google Street View ऍपबद्दल बोलत आहोत. हे गुगलचे स्टँडअलोन स्ट्रीट व्ह्यू ऍप आहे, जे येत्या काही दिवसांत ऍप स्टोअरवरून रिमूव्ह केले जात आहे. या ऍपसाठी सपोर्ट लवकरच बंद केला जाईल. 

हे ऍप बंद करण्यामागे काय आहे कारण ?

 Google Street View ऍप बंद केले जात आहे, कारण काही काळापूर्वी Google Maps ऍपवर स्ट्रीट व्ह्यू फीचर सादर करण्यात आले आहे. यामुळे आता गुगल स्ट्रीट व्ह्यू ऍपला काही अर्थ उरलेला नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, मार्च 2023 पर्यंत Google स्ट्रीट व्ह्यू ऍप iPhone आणि Android वापरकर्त्यांसाठी पूर्णपणे बंद होईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :