Google ने ऑनलाईन कर्ज देणाऱ्या ऍप्सवर बंदी घालनाची घोषणा केली आहे. Googleचे नवे फायनान्शियल सर्व्हिस पॉलीसी जाहीर झाली आहे. हे धोरण 31 मे 2023 पासून देशभरात लागू होणार आहे. त्यामुळे जर तुमच्या फोनमध्ये कर्ज देणारे ऍप्स असतील, त्यामध्ये तुमचा वैयक्तिक डेटा असेल. तर तो डिलीट करणे किंवा आताच सेव्ह करणे गरजेचे आहे. नाही तर, 31 मे नंतर तुमचा पर्सनल डेटा डिलीट केला जाईल. या ऍप्सवर बॅन का करण्यात येत आहे ते बघुयात-
ऑनलाईन लोन देणारे ऍप्स म्हटलं की, डोक्यात आधीच फसवणूक हा शब्द येतो. कारण या ऍप्सवर आधीपासूनच फसवणुकीचे आरोप केले जात आहेत. तसेच, या ऍप्सवर ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरी केल्याचा देखील आरोप आहे. पण, आता मात्र केंद्र सरकार याबाबत कठोर झाले आहे. अशा परिस्थितीत गुगलने कर्ज देणाऱ्या ऍप्सवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे.
आणि म्हणूनच Googleने अशा ऍप्ससाठी पर्सनल लोन पॉलिसी अपडेट जारी केले आहे. याद्वारे प्ले स्टोअरवरील कर्ज देणाऱ्या ऍप्सवर बंदी घातली जाईल. या अपडेटनंतर ऍप्स युजरच्या बाह्य स्टोरेजमधून फोटो, व्हीडिओ, कॉन्टॅक्ट, लोकेशन आणि कॉल लॉग्समध्ये जाऊ शकणार नाहीत.
मोबाईल ऍप्सच्या कर्जदारांकडून कर्जाच्या नावाखाली ग्राहकांना त्रास दिला जात, असल्याची तक्रार वारंवार येत असते. कर्ज देणारे एजंट्स ग्राहकांच्या वैयक्तिक डेटाचा चुकीचा वापर करतात, म्हणून सरकारने यासाठी आता कठोर निर्णय घेतला आहे.