गुगलने आपल्या कीबोर्ड अॅपला अपडेट केले आहे. गुगलने ह्यात अनेक नवीन फीचर्स सामील केले आहेत. जसे की वन हँडेंड मोड आणि कीबोर्डची उंची अॅडजस्ट करण्याचा पर्याय. ह्या नवीन अपडेटमध्ये समावेश वन हँडेड मोडच्या माध्यमातून आता यूजर मोठी स्क्रीन असलेल्या डिवाइसेसवर अगदी सहजपणे एका हाताचा वापर करुन टायपिंग करु शकाल. सेटिंग्सच्या माध्यमातून ह्या कीबोर्डची उंची अॅडजस्ट करु शकाल.
हेदेखील पाहा – लेनोवो वाइब k4 नोट ची एक झलक
आता यूजर कोणत्याही कि ला थोडा वेळ दाबून चिन्हाला सिलेक्ट करु शकतील. ह्याआधी चिन्हाला सिलेक्ट करण्यासाठी Alt कि च्या माध्यमातून लेआउट वर जात होते. गुगल कीबोर्डच्या माध्यमातून आता एमोजिसला सुद्धा लवकर एक्सेस केले जाऊ शकते. जेस्चर टायपिंगमध्ये अनेक बदल केले गेले आहेत. आता यूजर कोणत्याही शब्दाला काही वेळ दाबून सिलेक्ट करुन डिक्शनरीमधून डिलिटसुद्धा करु शकतील. आता ह्या अपडेटला जारी केले गेले आहे आणि लवकरच हे नवीन अपडेट सर्व यूजर्सला मिळेल.
हेदेखील वाचा – सोनी SRS-XB3 वायरलेस स्पीकर लाँच, किंमत १२,९९० रुपये
हेदेखील वाचा – शाओमी Mi5 आणि शाओमी रेडमी नोट 3 आज दुपारी २ वाजल्यापासून मिळणार ओपन सेलमध्ये