Google च्या मालकीची ईमेल सर्व्हिस Gmail कदाचित लवकरच पेड होणार आहे. खरं तर, त्यांनी प्लॅटफॉर्मवर जाहिराती दाखवायला सुरुवात झाली आहे. आगामी दिवसांत प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त जाहिराती दाखवल्या जातील, असा कंपनीने दावा केला आहे. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात-
Gmail द्वारे ईमेल सूचीच्या मध्यभागी जाहिरात समाविष्ट केली आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना मेल बघण्यासाठी अडचणी येत आहेत. याबाबत अनेक जीमेल युजर्सच्या तक्रारीसुद्धा आल्या आहेत. त्याबरोबरच, कंपनीच्या या निर्णयावर वापरकर्त्यांकडून टीका देखील सुरु आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, Gmail च्या वेब आणि मोबाइल ऍप या दोन्ही आवृत्त्या गेल्या एका आठवड्यापासून जाहिराती दाखवत आहे. याआधी जाहिराती ईमेल लिस्टच्या वर दाखवल्या जात होत्या, ज्यामुळे त्या ईमेलवर नेव्हिगेट करणे सोपे होते. परंतु, आता जाहिराती ईमेल सूचीद्वारे प्रसारित केल्या जातात म्हणून वापरकर्त्यांना हे नेव्हिगेट करण्यात अडचणी येत आहेत.
अलीकडेच, Gmail द्वारे नवीन ब्लू चेकमार्क फिचर आणले गेले आहे. त्यामुळे, प्लॅटफॉर्म लवकरच पेड होणार, आधी शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः कंपनी जाहिराती न पाहण्याच्या बदल्यात सबस्क्रिप्शन मॉडेल लागू करेल.