Gemini सह सुसज्ज AI फीचर Gmail मध्ये दाखल, आता ‘हे’ महत्त्वाचे काम युजरसाठी झाले अगदी सोपे
Gmail मध्ये नवे AI फीचर जोडण्यात आले आहे.
Gmail च्या नव्या AI फीचरचे नाव 'Q&A' फिचर आहे.
Gmail चे नवे फिचर Google च्या नवीनतम Gemini चॅटबॉटसह सुसज्ज आहे.
Gmail New Feature: आता सर्वत्र AI तंत्रज्ञानाचा वापर सुरु आहे. वापरकर्त्यांच्या सोयी लक्षात घेऊन Gmail मध्ये नवे AI फीचर जोडण्यात आले आहे. या नव्या फिचरचे नाव ‘Q&A’ फिचर आहे, जे Google च्या नवीनतम Gemini चॅटबॉटसह सुसज्ज आहे. याद्वारे, अँड्रॉइड मोबाइल वापरकर्ते त्यांच्या ईमेलशी संबंधित प्रश्न विचारण्यास सक्षम असतील. याआधी हे फीचर वेब यूजर्ससाठी प्रसिद्ध करण्यात आले होते. चला तर मग जाणून घेऊयात नव्या ‘Q&A’ फिचरबद्दल सर्व तपशील-
Also Read: BSNL Cheapest Plan: डेली 2GB दैनंदिन डेटासह कंपनीचे अप्रतिम प्लॅन्स, किंमत 200 रुपयांपेक्षा कमी
Gmail चे नवे Q&A फिचर
Google च्या अधिकृत ब्लॉगपोस्टनुसार Gmail मध्ये नवे AI फिचर सादर केले गेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Gmail मधील Q&A फिचरद्वारे न वाचलेले मॅसेज दाखवणे, विशिष्ट प्रेषकांचे ईमेल पाहणे आणि इनबॉक्समध्ये उपस्थित असलेल्या ईमेलचा सारांश करणे यासारखी कामे केली जाऊ शकतात. या फिचरद्वारे ईमेल लिहिणे आणि समजणे खूप सोपे होणार आहे.
‘अशा’प्रकारे करेल काम
Gmail चे नवीन फीचर इनबॉक्समध्ये उपस्थित असलेले ईमेल वाचण्यास सक्षम आहे. याशिवाय, नव्या फीचरमध्ये युजर्सना ईमेलशी संबंधित प्रश्न विचारण्यापासून ते गुगल ड्राइव्हमध्ये उपलब्ध असलेल्या फाईल्सचे विशिष्ट तपशील मिळेल. टेक कंपनी Google ने जेमिनी बिझनेस, एंटरप्राइझ, एज्युकेशन, एज्युकेशन प्रीमियम आणि Google One AI प्रीमियम ॲड-ऑन असलेल्या ग्राहकांसाठी Gmail ची नवीन फीचर्स आणण्यास सुरुवात केली आहे. येत्या 15 दिवसांत सर्व युजर्सना या फीचरसाठी सपोर्ट उपलब्ध करून दिला जाईल.
iOS युजर्सना देखील मिळेल नवी सुविधा
Gmail चे नवीन फीचर केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठीच नाही तर iOS वापरकर्त्यांसाठी देखील आणले जाईल. मात्र, नव्या फीचरचे सपोर्ट iPhone वापरकर्त्यांना कधी सपोर्ट मिळेल, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. 2024 च्या अखेरीस Q&A फीचर जागतिक स्तरावर रिलीज होईल, असे म्हटले जात आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile