अतिशय महत्त्वाचे आहेत Gmail चे ‘5’ फीचर्स, तुम्हाला माहिती आहेत का?

Updated on 18-Feb-2023
HIGHLIGHTS

Gmail च्या सेटिंग्जमध्ये अनेक उपयुक्त फीचर्स आहेत.

यात स्वाक्षरी समाविष्ट करण्यापासून ऑटो करेक्शन देखील आहे.

वापरकर्त्यांना हवे असल्यास ते Gmail ची भाषा देखील बदलू शकतात.

Googleचे Gmail प्रत्येक अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये असते. शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला ईमेल पाठवायचा आहे. बहुतेक वापरकर्ते या ईमेल सेवेचा लाभ घेतात. पण कधी कधी एखादी छोटीशी चूक युजर्ससाठी मोठी अडचण तयार करू शकते. अशा परिस्थितीत गुगलच्या जीमेल सेवेचे हे फिचर्स तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा : JIOचा नवीन 152 रुपयांचा नवीन प्लॅन, बघा काय मिळेल खास ?

ईमेल पाठवणे थांबवू शकतो

Gmail च्या सेटिंगमध्ये General नावाचा एक पर्याय आहे, ज्यामध्ये Undo Send चा पर्याय दिलेला आहे. यामध्ये यूजर्स सेंड मॅसेज थांबवण्याची वेळ वाढवू शकतात. जीमेलच्या बाजूने 30 सेकंद वेळ करता येईल.

Grammar सजेशन ऑन/ ऑफ करा

Gmail च्या सेटिंग्जमध्ये डीफॉल्ट टेक्स्ट स्टाइलच्या खाली Grammar पर्याय दिलेला आहे. यामध्ये, वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार ते ऑन आणि ऑफ करू शकतात. बदल सेव्ह केल्यानंतर बॉटमवरील सेव्ह पर्यायावर नक्कीच क्लिक करा.

Signature समाविष्ट करणे

Gmail वरून ईमेल पाठवताना, वापरकर्ते अनेकदा बॉटमला स्वतःबद्दल लिहायला विसरतात. या प्रकरणात, वापरकर्ते My signature भरू शकतात, जी Gmail च्या सेटिंग्जमध्ये आहे. यामध्ये एकापेक्षा जास्त स्वाक्षऱ्यांचा समावेश करता येईल. जुनी स्वाक्षरी देखील एडीट केली जाऊ शकते.

स्पेलिंग ऑन/ऑफ करता येईल.

Google च्या Gmail सेवेमध्ये स्पेलिंग चेक बाय डीफॉल्ट ऑन असते आणि तुम्ही स्पेलिंग चेक बंद देखील करू शकता. यासाठी, Gmail सेटिंग्जमध्ये जनरल कॅटेगरी अंतर्गत एक पर्याय आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :