फेसबुक आपल्या यूजर्सना एक उत्तम फीचर देणार आहे. ज्याद्वारे यूजर्स त्यांचे मित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांसाठी वेगवेगळे प्रोफाईल तयार करू शकतील. सध्या, फेसबुक वापरकर्त्यांना केवळ त्यांच्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या अकाउंटशी जोडलेले प्रोफाइल देते. परंतु भविष्यात ही स्थिती बदलेल, कारण मेटा-मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने नवीन फिचरची चाचणी सुरू केली आहे. जी वापरकर्त्यांना एकाच अकाउंटमध्ये पाच प्रोफाइल जोडण्याची परवानगी देईल. नवीन फीचरबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
हे सुद्धा वाचा : OTT this Weekend : या वीकेंडला OTT वर 'हे' चित्रपट-सिरीज बघा, हॉरर आणि ऍक्शन कंटेंटचा आस्वाद घ्या
अहवालानुसार, कंपनी काही फेसबुक वापरकर्त्यांना त्यांच्या मेन अकाउंटशी जोडलेल्या चार अतिरिक्त प्रोफाइल तयार करण्याची परवानगी देईल. यामागची कल्पना अशी आहे की, Facebook वापरकर्ते या अतिरिक्त प्रोफाइलचा वापर विविध उद्देशांसाठी करू शकतील. जसे की, एक त्यांच्या सहकाऱ्यांसाठी, एक त्यांच्या मित्रांसाठी, एक त्यांच्या स्वारस्यासाठी आणि एक प्रभावशाली लोकांसोबत संवाद साधण्यासाठी इ. उद्देश असू शकतात. हे सर्व प्रोफाईल त्यांच्या Facebook अकाउंटच्या कार्यक्षेत्रात राहतील, जे अपरिवर्तित राहतील, परंतु वापरकर्ते सहजपणे या प्रोफाइलमध्ये स्विच करू शकतील.
स्वतंत्र प्रोफाइल तयार करण्यासाठी हे फीचर वापरणाऱ्या फेसबुक वापरकर्त्यांना काही नियमांचे पालन करावे लागेल. सर्व प्रोफाइलमध्ये ऑपरेशनचे सामान्य नियम सारखेच राहतील. मात्र, जर एखाद्या युजरच्या प्रोफाइलमध्ये पॉलिसीचे उल्लंघन होत असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण अकाउंटवर होईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या वापरकर्त्याच्या विशिष्ट प्रोफाइलने Facebook च्या कम्युनिटी गाईडलाईन तत्त्वांचे उल्लंघन केले आणि कंपनीने प्रोफाइल एका दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला, तर केवळ प्रोफाइलच नाही तर संपूर्ण खाते त्या कालावधीसाठी निलंबित केले जाईल.
फेसबुकने सांगितले की, अतिरिक्त प्रोफाइल तयार करणाऱ्या वापरकर्त्यांना त्यांच्या डिस्प्ले नावांमध्ये त्यांची खरी ओळख वापरण्याची आवश्यकता नाही, जोपर्यंत स्टँड-इन डिस्प्ले नाव कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन करत नाही.
फेसबुकने सांगितले की, हे फिचर अद्याप चाचणीच्या टप्प्यात आहे. हे फिचर अशा वेळी आले आहे जेव्हा प्लॅटफॉर्मचा ऍक्टिव्ह युजर बेस कमी होत आहे.