आता हवाई आणि रेल्वे टिकटची बुकिंगसुद्धा करणार फ्लिपकार्ट
फ्लिपकार्टच्या माध्यमातून आता तुम्ही रेल्वे आणि हवाईचे तिकिट काढू शकता.लवकरच फ्लिपकार्ट ही सेवा सुरु करणार आहे.
आपल्या सर्वांना माहितच आहे की हल्लीच फ्लिपकार्टने डिजिटल प्रोडक्टची एक मोठी रेंज सुरु केलीय आणि आता पुन्हा एकदा ग्राहकांना आश्चर्यचकित करणारी आणखी एक योजना फ्लिपकार्ट बनवत आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल जी ऐकून सर्व चकित झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी फ्लिपकार्टने मेक माय ट्रीप कंपनीशी बातचीतही केली आहे की त्यांनी फ्लिपकार्टच्या माध्यमातून आपली बुकिंग करावी,मिळालेल्या माहितीनुसार ह्या वर्षाअखेरीस फ्लिपकार्ट ही सेवा सुरुही करेल असे सांगितल जातय. त्यानंतर तुम्ही फ्लिपकार्टवर तुमचे ई-तिकिट बुक करु शकता. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या बातमीनुसार फ्लिपकार्टच्या वरिष्ठ अधिकारीने सांगितले आहे की, आम्ही फ्लिपकार्टच्या बाजार ठिकाणावर मेक माय ट्रिप पॉवर्ड तिकिटींगला जोडण्याच्या तयारित आहोत. हयामुळे फ्लिपकार्टचे उपभोक्ता सरळ फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावरुन रेल्वे, बस आणि विमानाच्या तिकिटांची बुकिंग करु शकतात. मात्र याबाबत अजूनही काहीही बोलले जात नाहीय तसेच फ्लिपकार्टने ईटीद्वारा पाठवलेल्या मेलला अजूनपर्यंत मेक माय ट्रिपने काही उत्तर दिलेले नाही.
ऑनलाईन ट्रॅव्हल मार्केटप्लेस, मेक माय ट्रिप जे ऑनलाईन ट्रॅव्हल बुकिंग ऑफर करणे, मोबाईल रिचार्ज करुन देणे आणि तुमचे बिल भरुन देण्याची ही ऑनलाईन पद्धत सध्या युजरर्समध्ये अत्यंत लोकप्रिय होतेय. आणि भारताच्या मार्केट जगतात जेथे हया गोष्टीला खूप महत्व आहे तेथे हे नक्कीच यशस्वी होईल.
हयाच्याबरोबर अजून एक गोेष्ट सांगावीशी वाटते की अॅमेझॉननेही भारतीय रेल्वेसोबत भागीदारी करण्याची घोषणा केलीय. आणि ते आता IRCTCच्या ऑनलाईन टिकिटिंगचे अधिकाधिक भागीदार झालेत. मार्चमध्ये ही घोषणा पुढील २ वर्षांसाठी केलीय. हयाच्या जोडीला स्नॅपडीलनेही मोबाईल रिचार्जमध्ये आपल्या नशीब अजमावण्याच्या विचारात आहे. आणि त्याच्याबरोबरच फ्री रिचार्ज देण्यासाठी सुरुवात केलीय. हयाच्याबरोबर ऑनलाईन रिटेलरही पेस्ट कंट्रोल, मोबाईल आणि बिल भरण्याची सेवा देत आहेत आणि त्याचबरोबर आर्थिक सेवा जशा होम आणि पर्सनल लोनची सेवाही देतात.