देशांतर्गत ई-कॉमर्स साइट Flipkart ने मेटाव्हर्सच्या धर्तीवर Flipverse सादर केले आहे. जे ऑनलाईन शॉपिंगची संपूर्ण स्टाईल आणि पद्धत बदलणार आहे. Flipverse साठी Flipkart ने वेब3 वर्ल्डमध्ये ग्लोबल आर्ट, मीडिया आणि एंटरटेनमेंट IP लाँच करण्यासाठी eDAO सोबत भागीदारी केली आहे. Flipverse एक्सपेरियन्स युजर्स Android ऍपवर घेण्यास सक्षम असतील. मात्र, iPhone वापरकर्त्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हे सुद्धा वाचा : WhatsApp युजर्ससाठी खुशखबर, हे नवीन फीचर्स चॅटिंगला अधिक मजेदार बनवतील
फ्लिपवर्स हे एक मेटाव्हर्स आहे, जिथे तुम्ही उपस्थित नसतानाही मॉलप्रमाणे घरी बसून खरेदी करू शकता. यामध्ये ग्राहकांना सुपरकॉइन्स मिळवण्याची संधी देखील मिळणार आहे आणि नवीन ऑफर देखील उपलब्ध होणार आहेत. फ्लिपकार्टने त्याचे फ्लिपव्हर्स यशस्वी करण्यासाठी Puma, Noise, Nivea, Lavie, Tokyo Talkies, Campus, VIP, Ajmal Perfumes सारख्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे.
फ्लिपकार्टने हे लाँच करताना सांगितले की, 15 वर्षांपूर्वी फ्लिपकार्टने वेब 2.0 वर सुरुवात केली होती आणि आता ती देशातील पहिली वेब 3.0 ई-कॉमर्स साइट बनली आहे.
फ्लिपकार्टने सांगितले की, लॉन्चचा उद्देश खरेदीचा अनुभव पूर्णपणे 'फ्लिप' करणे आणि ग्राहकांना टू-वे कम्युनिकेशनमुळे त्यांच्या आवडत्या ब्रँडच्या जवळ जाण्याची परवानगी देणे आहे. फ्लिपकार्टच्या नुकत्याच लाँच केलेल्या फायरड्रॉप्स प्लॅटफॉर्मवर फ्लिपवर उपलब्ध करून दिले जाईल. जे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या ऍपवरून ऍक्सेस केले जाऊ शकते.