ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी एक आकर्षक प्रोग्राम घेऊन आली आहे. ह्या एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून कंपनी जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याशी जोडू इच्छिते आणि आपली विक्रीसुद्धा वाढवू इच्छिते. फ्लिपकार्टने आपल्या ह्या नवीन ऑफरचे नाव बिग एक्सचेंज डेज ठेवले आहे. ह्या ऑफरच्या नावावरुन तर असच वाटत आहे की, ग्राहक ह्या एक्सचेंजच्या अंतर्गत अनेक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.
‘फ्लिपकार्ट बिग एक्सचेंज डेज’ च्या अंतर्गत स्मार्टफोन, टॅबलेट्स, लॅपटॉप, टेलीव्हिजन, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन सारख्या अनेक प्रोडक्ट्सवर एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. फ्लिपकार्टचा हा बिग एक्सचेंज डेज ऑफर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि दुस-या तारखेला आयोजित केली जाईल. ह्याच्या अंतर्गत यूजर्सला सहजरित्या एक्सचेंज मिळेल.
ह्या एक्सचेंज प्रोग्रामसाठी फ्लिपकार्टने आपल्या डिलिवरी एक्झिक्युटिव्हला योग्यरित्या ट्रेनिंग दिली आहे, जेणेकरुन ह्याला प्रोग्रामला योग्यरित्या लोकांपुढे आणू शकेल.
मिळालेल्या माहितीनुसार, ह्या ऑफरच्या अंतर्गत स्मार्टफोनला एक्सचेंज करण्यासाठी ग्राहकांना स्मार्टफोनचा IMEI नंबर द्यावा लागेल. त्याचबरोबर कंपनीची एक्झिक्युटिव्ह स्मार्टफोनची स्क्रीन आणि एकूणच त्याच्या स्थितीचे व्यवस्थित निरीक्षण करेल. तेथेच टीव्ही संबंधीही डिलिवरी एक्झिक्युटिव्ह, टीव्हीला व्यवस्थितपणे चालू/बंद करुन पाहिल तसेच लॅपटॉप आणि वॉशिंग मशीनमध्येही डिलिवरी एक्झिक्युटिव्ह व्यवस्थितरित्या चालू करुन त्याचे निरीक्षण करेल.
फ्लिपकार्ट ह्या एक्सचेंज प्रोग्रामच्या माध्यमातून विक्रीचा २० टक्के हिस्सा कव्हर करेल.
हेदेखील पाहा – हे १० अॅप्स तरुण पिढीच्या फोनमध्ये असलेच पाहिजे
हेदेखील वाचा- वनप्लस 2 चा 16GB चा प्रकार भारतात विक्रीसाठी उपलब्ध