फेसबुर लाइव ब्रॉडकास्टमध्ये नवीन फीचर्सचा समावेश
फेसबुक लाइवला नवीन अपडेट मिळाले आहे, त्यात एक डेडिकेटेड टॅब, रियल टाइम रिअॅक्शन, फिल्टर्स आणि काही इतर फीचर्स मिळतात.
फेसबुकने आपल्या लाइव व्हिडियो ब्रॉडकास्टिंग फेसबुक लाइवमध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश केला आहे. कंपनीने सांगितले आहे की, ह्या नवीन फिचर्सच्या माध्यमातून यूजर्स सहजपणे ह्या फेसबुक लाइवचा वापर करु शकतात. ह्या नवीन फीचर्सच्या माध्यमातून यूजर्स आपल्या लाइव ब्रॉडकास्टला आणखी जास्त पर्सनल बनवू शकता. फेसबुक लाइबच्या माध्यमातून यूजर्स फेसबुक ग्रुप्स आणि इव्हेंट्समध्ये लाइव होऊ शकतात. जेव्हा कोणी यूजर कोणत्या ग्रुपमध्ये लाइव असेल, तेव्हा तो केवळ त्या ग्रुपमध्येच लाइव असेल, तर इव्हेंट लाइवमध्ये यूजर सर्व लोकांपर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर फेसबुकने मोबाइल अॅपवर फेसबुक लाइवसाठी एक डेडिकेटेड टॅबसुद्धा जोडला आहे.
हेदेखील पाहा – ह्या अॅप्सच्या माध्यमातून भारतातील प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट
फेसबुकने ह्याबरोबर लाइव रिअॅक्शनसुद्धा सादर केली आहे, ज्याच्या माध्यमातून यूजर्स व्हिडियोवर आपल्या प्रतिक्रिया सांगू शकतात. ह्या न्यूजफीडमध्ये असलेल्या रिअॅक्शन सारखे काम करतात. त्याचबरोबर लाइव व्हिडियो दरम्यान आलेले कमेंट्सला फेसबुक पुन्हा एकदा दाखवेल. तसेच व्हिडियो पाहत असलेले लोक लाइव व्हिडियो दरम्यान आपल्या मित्रांनासुद्धा हे पाहण्यासाठी निमंत्रण पाठवू शकतात. फेसबुकने पाच लाइव फिल्टर्ससुद्धा लाँच केले आहे. कंपनीने सांगितले आहे की, लवकरच यूजर्सला अपनी लाइव व्हिडियोवर डूडल पाहण्याची सुविधाही मिळेल.
हेदेखील वाचा – आयफोन SE, आयपॅड प्रो आता अधिकृतरित्या भारतात उपलब्ध
हेदेखील वाचा – मिजू M3 नोट: 4100mAh क्षमतेची बॅटरी लाइफ देणारा स्मार्टफोन
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile