फेसबुकने आज एक अशी सेवा सुरु केली आहे, ज्याचा मुख्य उद्देश नाते संपल्यानंतर एकमेकांशी जोडलेले राहण्यासाठी फेसबुकवर जोडून ठेवणे आहे. ह्या अंतर्गत फेसबुक ब्रेकअपनंतर पार्टनरला विसरण्यासाठी मदत करेल.
खरे पाहता, ह्या टूलचा उपयोग युजर्स तेव्हाच करु शकतात, जेव्हा यूजर्स आपल्या रिलेशनशिप स्टेटस बदलत असतील. तेव्हा ते यूजर्स अशी सूचना टाकू शकतील, की तो आपल्या आधीच्या पार्टनरसोबत नाही. ह्याआधी फेसबुकवर यूजर्सच्या पोस्टमध्ये, न्यूजफीडमध्ये आणि टॅगमध्ये त्याच्या आधीच्या प्रियकराची माहिती येत होती. त्यामुळे हेच एक कारण होते की, ब्रेकअप झाल्यानंतर जास्तकरुन लोक आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला फेसबुक पेजवरुन ब्लॉक करुन टाकतात किंवा आपल्या फ्रेंड लिस्टच्या यादीतून डिलिट करतात.
फेसबुकने ह्या टूलमध्ये अनेक खास फीचर्स जोडले आहे. एक म्हणजे आपला जुना साथी तुमच्या कोणते फोटो आणि व्हिडियो पाहू शकतो हे तुम्ही ठरवू शकता. तसेच आपण ब्लॉक न करता आपल्या जुन्या साथीदाराला आपल्या पेजवर मर्यादित कंटेंट पाहण्यासाठी एक्सेस करु शकता. त्याचबरोबर आपण आपल्या इतर मित्र-मैत्रिणींना मर्यादित एक्सेस देऊ शकतात की, कोण कोण तुमच्या जुन्या नात्याबद्दल जाणून घेऊ शकतो.
ह्या नवीन फीचरच्या माध्यमातून आता ब्रेकअप झाल्यानंतर फेसबुक यूजर्स आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीशी जोडलेले राहू शकतात आणि यूजरच्या प्रोफाईलमध्ये जुन्या नात्यांसंबधी कोणतीही माहिती येणार नाही.