आतापर्यंत सोशल मिडिया साइट फेसबुक तेव्हाच काम करत होती, जेव्हा आपल्याजवळ इंटरनेटची सुविधा असेल. मात्र आता लवकरच फेसबुक ऑफलाइन झाल्यावरसुद्धा काम करेल. स्वत: फेसबुकने ह्याबाबत माहिती दिली आहे.
फेसबुकने आज आपल्या मोबाईल अॅप्लीकेशनसह काही नवीन अपडेट आणले आहेत. त्यांच्या मदतीने आपण ऑफलाइनसुद्धा फेसबुक न्यूजफीडचा उपयोग करु शकता. एवढच नाही, तर धीम्या गतीने नेटवर्कवरसुद्धा हा उत्तमरित्या कार्य करेल.
फेसबुकद्वारा दिल्या गेलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या न्यूजफीड फंक्शनालिटीमध्ये येणा-या दिवसात अनेक बदल करणार आहेत. ह्या नवीन फीचर्सची टेस्टिंग केली जात आहे. हे सर्व फीचर त्या वेळी उपयोगास येतील जेव्हा अॅप संथ इंटरनेट कनेक्शनला डिटेक्ट करेल. ह्यात सर्वात महत्त्वाचा ऑफलाइन कमेंट सपोर्ट आहे.
फेसबुकने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हे बदल त्या प्रत्येक यूजरला उपयोगी पडतील, जो धीम्या गतीचा इंटरनेट वापरतात. हा फीचर त्या यूजरसाठीसुद्धा आहे, जे सर्वसामान्यपणे मजबूत नेटवर्कचा वापर करतात. मात्र कधी कधी हा सबवे आणि बोगद्यात कमकुवत होतो.” नवीन फीचरच्या मदतीने यूजर ऑफलाईन असतानाही कोणत्याही पोस्टवर कमेंट कंपोज करु शकतात. हे कमेंट इंटरनेट कनेक्शनशी जोडल्यानंतर पोस्ट केले जातील.
फेसबुकद्वारा सादर केलेल्या ह्या ऑफलाइन सेवेच्या अंतर्गत यूजर्स इंटरनेटशिवायसुद्धा फेसबुकचा उपयोग करु शकतात. ऑफलाईनच्या दरम्यान यूजर्स कोणत्याही स्टोरी आणि पोस्टवर कमेंट करु शकतात. त्याचबरोबर ऑफलाइन शेअर आणि लाइकसुद्धा करु शकतात. त्यानंतर जसे तुमच्याजवळ इंटरनेट कनेक्शन उपलब्ध होईल तसे कमेंट आणि पोस्ट आपोआप ऑनलाइन होतीन. त्याचबरोबर लाइक आणि शेअरसुद्धा दिसतील.