फेसबुकने लाँच केला आपला नवीन इमोशन ऑप्शन

Updated on 25-Feb-2016
HIGHLIGHTS

फेसबुकने लाइकचा अजून एक पुढचा टप्पा म्हणून ६ नवीन प्रतिक्रियात्मक बटनांचा समावेश केला आहे. ह्यात डिसलाइक नाही आहे. मात्र अँग्री बटन (रागावलेले)जरुर आहे.

मागील काही दिवसांपासून फेसबुक लाइक बटनाच्या विकल्पवर काम करत आहे. कंपनीने ह्या बटनांचे प्रदर्शन केले होतेे, ज्याना रिअॅक्शन बटन असे नाव दिले गेले. आता फेसबुकने आपला रिअॅक्शन फीचर लाँच केला आहे.

 

ह्या फीचरमध्ये आपल्याला लाइकसह कोणत्याही पोस्टवर आपले इमोशन अजून जास्त सोप्या पद्धतीने व्यक्त करण्यासाठी मदत होईल. फेसबुकने लाइकचा अजून एक पुढचा टप्पा म्हणून ६ नवीन प्रतिक्रियात्मक बटनांचा समावेश केला आहे. ह्यात डिसलाइक नाही आहे. मात्र अँग्री बटन (रागावलेले)जरुर आहे. फेसबुकने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

कंपनीने ह्या बटन्सचे नाव रिएक्शन बटन दिले गेले आहे. ह्याविषयी कंपनीने लिहिले आहे की, आज लाइक बटनचे विस्तार म्हणून अनेक रिअॅक्शन बटन सादर केले आहे. ह्याच्या माध्यमातून अनेक प्रकारे आपण कोणत्याही पोस्टवर आपली प्रतिक्रिया देऊ शकाल.

ह्या नवीन वैशिष्ट्याच्या अंतर्गत जेव्हा आपण लाइक आयकॉनवर टॅप करुन दाबून ठेवाल, तेव्हा आपल्याला ६ वेगवेगळे स्मायली मिळतील, ज्यात लव, अँग्री, फनी असे पर्याय आपल्याला मिळतील.

मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर वापरकर्त्याला अपडेटच्या माध्यमातून प्राप्त होईल. अर्थात फीचरचा उपयोग करण्यासाठी आपल्याला आपल्या फेसबुक अकाउंटला अपडेट करावे लागेल. अपडेटचे नोटिफिकेशन आपल्याला अॅनड्रॉईड फोनवर आपोआप मिळेल.

हेदेखील वाचा – अॅनड्रॉईड यूजर्ससाठी मायक्रोसॉफ्टने आणला नवीन कीबोर्ड अॅप

हेदेखील वाचा – शाओमी Mi5 : बहुप्रतिक्षित असा शाओमी Mi5 आहे स्नॅपड्रॅगन 820 ने सुसज्ज

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :