आता आपण आपल्या पूर्ण परिवारासह ग्रुप कॉलिंग करु शकता. फेसबुकने आपल्या मेसेंजरमध्ये ग्रुप कॉलिंग फीचर लाँच केले आहे. हे आपल्याला लवकरच अॅनड्रॉईड आणि iOs वर मिळणे सुरु होईल.
ह्यासाठी तुम्हाला केवळ फोन आयकॉनवर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर जेथे आपण व्हॉईस कॉल करु इच्छिता. त्या ग्रुपची निवड केली जाईल, तुम्ही कोणता कॉल जरी मिस केलात, तरी तो चालू असेल अशा वेळी तुम्ही पुन्हा एकदा फोन आयकॉनवर क्लिक करुन ग्रुप चॅटची निवड केल्यास तो पुन्हा एकदा कनेक्ट होईल. आपण कोणत्याही वेळी हेही माहित करुन घेऊ शकता की, कोण कॉलवर आहे . तसेच तुम्हाला एखाद्या वेळी कोणाला ह्या कॉलला कनेक्ट करायचे असेल तर तेही तुम्ही करु शकता.
हेदेखील वाचा – हे आहेत आकर्षक असे वॉटरप्रुफ गॅजेट्स, जे पाण्यात भिजले तरी होत नाही खराब
ह्या फिचरच्या माध्यमातून एकाचवेळी आपण १२ सदस्य जोडू शकता. मात्र आता असे सांगितले जात आहे की, आपण ५० लोकांसोबत एकाचवेळी व्हॉइस कॉल करु शकता.
त्याशिवाय एका रिपोर्टच्या माध्यमातून असे समोर आले आहे की, फेसबुकच्या मेसेंजरमध्ये “सिक्रेट चॅट” आणि रिटेल फीचरचा समावेश केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार फेसबुक मेसेंजर अॅपला रिटेल हबच्या आत बनविण्याचा विचार केला जात आहे. ज्याच्या माध्यमातून लोकांना ह्या अॅपच्या माध्यमातून वस्तूंना खरेदी करण्याचे किंवा विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल.
हेदेखील वाचा – फेसबुक मेसेंजरवर लवकरच येणार ‘सिक्रेट चॅट’ फीचर
हेदेखील वाचा – फ्लिपकार्ट सॅमसंग वीक: सॅमसंगच्या फोन्सवर मिळतोय आकर्षक डिस्काउंट