लवकरच स्मार्टफोन मध्ये या अॅप ला डाउनलोड करुन बनवता येईल तुमचा वोटर आयडी कार्ड

Updated on 20-Feb-2018
HIGHLIGHTS

भारतीय इलेक्शन कमीशन लवकरच एक नवीन अॅप लॉन्च करेल ज्यातून भारतीय आपला वोटर आयडी कार्ड बनवू शकतील किंवा त्यात काही बदल करू शकतील.

भारताला डिजिटल बनवण्याच्या मोहिमेअंतर्गत आता लवकरच भारतीय इलेक्शन कमीशन एक नवीन अॅप सादर करेल, ज्यातून लोक नवीन वोटर आयडी कार्ड बनवू शकतील. या अॅप मधुन लोक फक्त नवीन वोटर आयडी कार्ड बनवू शकणार नाहीत तर त्यांच्या जुन्या वोटर आयडी कार्ड मध्ये बदल पण करू शकतील. 

सध्या भारतीय इलेक्शन कमीशन हा अॅप बनविण्याचे काम करत आहे. या अॅप चे नाव 'ERONET (Electoral Rolls Services NeT)' ठेवण्यात आले आहे.
 
हा अॅप लॉन्च झाल्या नंतर लोक घरबसल्या आपल्या स्मार्टफोन मध्ये हा अॅप डाउनलोड करुन आपला वोटर आयडी कार्ड बनवू शकतील. 
प्राप्त माहिती नुसार, सध्या देशातील 22 राज्य हा अॅप आपल्याकडे लॉन्च करण्यासाठी तयार झाले आहेत. हा अॅप यावर्षीच्या जून महिन्यापासून पूर्ण देशभरात वापरता येईल. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :