ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि पेटीएमवर सेल चालू आहे. ह्या सेलमध्ये मोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयटम, गेमिंग कंसोल आणि अनेक इतर प्रोडक्टवर अनेक ऑफर्स मिळत आहेत. ह्या कंपन्यांनी ईयर-एन्ड च्या सेलचे आयोजन केले आहे.
फ्लिपकार्टच्या ऑफर्सचा लाभ हा केवळ त्याच्या अॅपच्या माध्यमातूनच घेतला जाऊ शकतो. फ्लिपकार्ट अॅपचे काही खास ऑफर्स अंतर्गत लेनोवो K3 नोट ला ८,९९९ रुपयात खरेदी केले जाऊ शकते. तर शाओमी Mi 4i ९,९९९ रुपये, मोटो G थर्ड जेन १०,४९९ रुपये आणि आसूस झेनफोन 2 लेजर 5.5 ८,९९९ रुपयांत मिळत आहे. त्याचबरोबर यूजर ४,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचासुद्धा लाभ घेऊ शकता. सॅमसंग गॅलेक्सी ऑन5 आणि सॅमसंग गॅलेक्सी ऑन7 स्मार्टफोन सूटसह ७,९९० रुपयात उपलब्ध आहे. तर ५,००० रुपयात एक्सचेंज ऑफरसुद्धा उपलब्ध केली आहे. मायक्रोमॅक्स कॅनवास एक्सप्रेस 4G ला ६,१९९ रुपयात खरेदी केले जाऊ शकते आणि एक्सचेंज ऑफर द्वारा ३,००० रुपयापर्यंत सूटसुद्धा मिळू शकते. फ्लिपकार्टवर सिटीबँक (1,750 रुपयापर्यंत) आणि स्टँडर्ड चार्टर्डच्या (२,००० रुपयापर्यंत) कार्डवर १० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते.
अॅमेझॉन इंडिया विषयी बोलायचे झाले तर, येथेसुद्धा इयर-एन्ड सेलचे आयोजन केले गेले आहे. वेबसाइटवर प्रोडक्ट सूटसह लायटनिंग डील्सच्या अंतर्गत उपलब्ध होतील. त्याचदरम्यान यूजर मोबाईल, मोबाईल एक्सेसरी आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टवर सूटची आशा करु शकतात.
पेटीएमविषयी बोलायचे झाले तर, येथे मेगा इलेक्ट्रॉनिक्स सेलचे आयोजन केले गेले आहे. होम अप्लायन्सेसवर १०,००० रुपयापर्यंत पेटीएम मनी कॅशबॅक मिळत आहेत ह्या सेल अंंतर्गत आयफोन 6S चा 16GB व्हर्जन कॅशबॅकसह ४०,६८८ रुपयात मिळेत आहे.