दिल्लीली स्वच्छ बनवण्याच्या अभियानाचे उद्घाटन केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू 22 नोव्हेंबरला करतील. हे अभियान २२ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत चालेल.
दिल्ली सरकारने दिल्लीला स्वच्छ बनविण्यासाठी ‘स्वच्छ दिल्ली’ नावाचे एक अॅप सुरु केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ’स्वच्छ दिल्ली’ नावाचे मोबाईल अॅप्लीकेशन लाँच केले. हा अॅप लोकांना दिल्लीला स्वच्छ बनविण्यासाठी केंद्र, दिल्ली सरकार आणि तिन्ही नगर निगम यांना एकत्रित करेल.
दिल्लीली स्वच्छ बनवण्याच्या अभियानाचे उद्घाटन केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू 22 नोव्हेंबरला करतील. हे अभियान २२ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत चालेल. ह्या अॅप्लीकेशनच्या अंतर्गत ग्राहक कच-याचे फोटो अगदी सहज काढू शकतात. अॅपद्वारा काढलेल्या कच-याच्या ढिगा-याचे फोटो दिल्ली सरकार आणि एमसीडीच्या कर्मचा-यांना मिळेल. जेणेकरुन त्या ठिकाणी त्यांचे विशेष पथक पाठवतील.
जर तक्रारदार त्यांच्या सफाईने खूश नसेल तर तो पुन्हा तक्रार करु शकतो. स्वच्छ दिल्ली अॅपच्या माध्यमातून सेंट्रल कंट्रोल रुममध्ये माहिती पाठवली जाईल आणि तेथे सर्व माहिती डाटा स्वरुपात उपलब्ध असेल.
ह्याविषयी अधिक माहिती देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, ‘ज्या लोकांजवळ तक्रारी असतील, ते ७६६६४००४०० वर फोन करु शकतात त्यानंतर फोन करणा-या व्यक्तिला आपल्या मोबाईलवर एक लिंक मिळेल, ज्याच्या माध्यमातून तो स्वच्छ दिल्ली अॅपला डाऊनलोड करु शकतो.’